शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कोणाचा काही नेम नाही; सॅनिटायझरचा वापर होतोय चूल पेटवण्यासाठी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 16:35 IST

ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून घरोघरी सॅनिटायझर तसेच मास्कही पुरविले.

ठळक मुद्देसुरूवातीला हात निर्जंतूक करण्यासाठीच सॅनिटायझरचा उपयोग केला जात होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रास गैरवापर

- बाबुराव चव्हाण 

उस्मानाबाद : लोक कोणत्या गोष्टीचा, कशासाठी वापर करतील याचा नेम नाही. कोरोनाला स्वत:पासून दूर ठेवायचे असेल तर वेळोवेळी हात सॅनिटाईज करणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी घरोघरी जाऊन मोफत सॅनिटायझर पुरविले; परंतु सध्या या सॅनिटायझरचा हात निर्जंतुक करण्यासाठी कमी अन् पावसाळ्याचे दिवस असल्याने चूल पेटविण्यासाठी अधिक उपयोग होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मुंबई, पुणे यासारख्या शहरातून कोरोना विषाणू ग्रामीण भागातही पोहोचला. त्यामुळेच बाधितांच्या संख्येत झपाट्याने भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग यासह वेळोवेळी हात सॅनिटाईझ करण्याचा सल्ला दिला जात आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील लोकातही हात सॅनिटाईझ करण्याचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून घरोघरी सॅनिटायझर तसेच मास्कही पुरविले. सुरूवातीला हात निर्जंतूक करण्यासाठीच सॅनिटायझरचा उपयोग केला जात होता. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे सकाळी पाणी तापवण्यासाठी अथवा स्वयंपाकासाठी चूल पेटविताना ग्रामीण भागातील गृहिणींच्या नाकीनऊ येते. पूर्वी रॉकेलच्या सहाय्याने चुली पेटविल्या जात; परंतु शहरांसोबतच ग्रामीण भागातही गॅस वापरकर्त्यांची संख्या वाढल्याने रॉकेल मिळणे बंद झाले.

रॉकेलप्रमाणे सॅनिटायझरही पेट घेते, ही खबर एका गृहिणीकडून दुसऱ्या  गृहिणीकडे पोहोचली. अन् बघता-बघता सॅनिटायझरचा वापर हात निर्जंतूक करण्यासाठी कमी अन् चूल पेटविण्यासाठी अधिक सुरू झाला. हा प्रकार धोकादायक असून, वेळप्रसंगी जीवावरही बेतू शकतो. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सॅनिटायझर वापराबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे आता सॅनिटायझर चूल पेटविण्यासाठी वापरणे धोकादायक आहे, हेही ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे झाले आहे.

खवाभट्टी चालकांकडून सॅनिटायझर संकलितभूम, वाशी आदी तालुक्यांत खवाभट्ट्यांची संख्या मोठी आहे. चुलीप्रमाणे खवाभट्ट्याही पावसाळ्यात लवकर पेट धरत नाहीत. सध्या रॉकेलही मिळत नाही. त्यामुळे काही खवाभट्टी चालकांनी आपल्या संबंधातील लोकांकडून सॅनिटायझरच्या बाटल्या संकलित केल्या आहेत. हे सॅनिटायझर भट्टी पेटविण्यासाठी उपयोगात आणले जात  आहे. 

जीवावर बेतू शकते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय गरजेनुसारच सॅनिटायझरचा वापर होणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी हात निर्जंतुक करण्यासाठीच त्याचा उपयोग करावा. चूल पेटविणे वा अन्य कारणांसाठी उपयोगात आणल्यास जिवावरही बेतू शकते. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून ग्रामपंचायतींनीही गावातील लोकांमध्ये जनजागृती करावी.-डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याfireआग