ढाेकी-पळसप रस्त्यावर सातत्याने वाहनांची वर्दळ असते. मात्र, या रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनधारक तर प्रचंड त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. परंतु, संबंधित यंत्रणेकडून आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेले मनसेचे तालुका उपाध्यक्ष सलीम औटी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी खड्ड्यांमध्ये बेशरमाची लागवड करून गांधीगिरी केली. यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही तर तीव्र आंदाेलन करू, असा इशाराही देण्यात आला. यावेळी रजनीकांत ढवारे, अण्णा जराड समाधान, ढवारे बापू लंगडे आदींची उपस्थिती हाेती.
230921\1810-img-20210923-wa0027.jpg
ढोकी पळसप खड्डेमय रस्त्यावर मनसेने बेशरमाची झाडे लावून केला निषेध