जेवळी : लोहारा तालुक्यातील आष्टाकासार ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुलभा कांबळे यांची तर उपसरपंचपदी सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंतराव सुलतानपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर नूतन सरपंच, उपसरपंचांची हलग्याच्या कडकडाटात रथामधून विजयी मिरवणूक काढण्यात आली. येथील सरपंच पद हे अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी राखीव होते. त्यामुळे सरपंचपदासाठी सुलभा दशरथ कांबळे व राहुल गायकवाड यांनी अर्ज दाखल केला होता. तर उपसरपंच पदासाठी वसंतराव सुलतानपुरे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता. राहुल गायकवाड यांनी अर्ज मागे घेतल्याने सरपंच आणि उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली. यावेळी विजयी उमेदवारांचा सत्कार करून गावातून त्यांची रथातून हलग्याच्या कडकडाटामध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सुरेश वाघमोडे, शरणप्पा फुडीपल्ले, नागनाथ माळी, जगदीश बदोले, काशिनाथ घोडके, ज्ञानेश्वर चव्हाण, मुकेश सोमंवशी, मौलानी शेख, संजय चौधरी, नागनाथ मदने उपस्थित होते.
सरपंच, उपसरपंचांची रथातून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:34 IST