शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नातवंडांना खेळवायच्या वयात प्रेयसीसाठी केल्या घरफोड्या, सत्तारमियाँला एलसीबीच्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 13:21 IST

Robbery for girl friend at Osmanabad लातूरच्या लालबहादूर शास्त्री नगरात राहणारा सत्तार बाबुमियाँ सय्यद हा लातूर, उस्मानाबाद तसेच सोलापूर जिल्ह्यात गुन्हे करीत होता.

ठळक मुद्देघरफोड्यांच्या प्रकरणामध्ये सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी २ वर्षांची शिक्षा झाली आहे. ही शिक्षा भोगून आला की तो लगेच पुन्हा दुसरे गुन्हे करीत होता. यावेळी त्याने आपला मोर्चा उस्मानाबाद जिल्ह्याकडे वळविला.

उस्मानाबाद : लातूरचा सत्तारमियाँ... वय वर्षे ५५... दोनवेळा शिक्षा भोगून आलेला... तरीही घरफोड्यांचा नाद काही सुटेना.नातवंडं खेळवायच्या वयात प्रेयसीसाठी दुसऱ्यांच्या घरात घुसून चोऱ्या करणाऱ्या सत्तारने उस्मानाबाद जिल्ह्यात तब्बल ८ गुन्हे केले. स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने त्यास पकडून सोने-चांदी अन् रोकड जप्त केली आहे.

पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी या गुन्ह्याबाबतचा तपशील समोर आणला. लातूरच्या लालबहादूर शास्त्री नगरात राहणारा सत्तार बाबुमियाँ सय्यद हा लातूर, उस्मानाबाद तसेच सोलापूर जिल्ह्यात गुन्हे करीत होता. यापूर्वी त्याला घरफोड्यांच्या प्रकरणामध्ये सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी २ वर्षांची शिक्षा झाली आहे. ही शिक्षा भोगून आला की तो लगेच पुन्हा दुसरे गुन्हे करीत होता. यावेळी त्याने आपला मोर्चा उस्मानाबाद जिल्ह्याकडे वळविला. मागील वर्षभरात त्याने शहर, आनंदनगर, कळंब, बेंबळी, उमरगा, आंबी, परंडा ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ८ घरफोड्या केल्या. त्याची मोडस ऑपरेंडी म्हणजे तो हे सगळे गुन्हे दिवसाच करीत होता. दिवसाढवळ्या घडणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलीसही हैराण झाले होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक पांडुरंग माने, कर्मचारी महेश घुगे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, अविनाश मरलापल्ले, अमोल कावरे यांनी गोपनीय माहिती मिळवीत सत्तारचा छडा लावला. त्याला लातुरातून ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने ८ घरफोड्यांची कबुली दिली. यापैकी ६ गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. उर्वरित २ गुन्ह्यातील मुद्देमालाचा तपास सुरु असल्याचे अधीक्षक राजतिलक रौशन यांनी सांगितले. या कामगिरीबद्दल त्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाची पाठ थोपटली.

८० ग्रॅम सोने, ४० ग्रॅम चांदी...आरोपी सत्तारने चोरी केलेल्या मुद्देमालापैकी ८० ग्रॅम सोने व ४० ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच ४१ हजाराची रोकडही ताब्यात घेण्यात आली आहे. सत्तारला पत्नीसह ६ मुले व १ मुलगी असे मोठे कुटूंब आहे. ते सर्वजण प्रामाणिकपणे आपापले काम करुन पोट भरतात. मात्र, सत्तार हा एका दुसऱ्या महिलेच्या नादी लागला. दोघांच्या उदरनिर्वाहासाठी त्याने चोऱ्या करण्याचा मार्ग दोनवेळा जेलवारी होऊनही सोडला नाही.

टॅग्स :RobberyचोरीOsmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारी