कळंब येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:37 AM2021-08-20T04:37:50+5:302021-08-20T04:37:50+5:30

कळंब : श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, जलमंदिर प्रतिष्ठान व सोमनाथभाऊ फाऊंडेशन यांच्यावतीने कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती ...

Response to blood donation camp at Kalamb | कळंब येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

कळंब येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद

googlenewsNext

कळंब : श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, जलमंदिर प्रतिष्ठान व सोमनाथभाऊ फाऊंडेशन यांच्यावतीने कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजीराजे शाॅपिंग सेंटर येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ७६ जणांनी रक्तदान केले.

जलमंदिर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजित काळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ॲड. शकुंतला फाटक-सावळे, संध्या सोनटक्के, अकीब पटेल, श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे उस्मानाबाद संपर्क प्रमुख परवेज मुल्ला, तालुका कार्याध्यक्ष अमोल मोरे, जलमंदिर प्रतिष्ठानचे विशाल भोरे, सानी कांबळे, मयूर लोखंडे,वैरागे, उमेश देडे, अक्षय रणदिवे, सचिन कुचेकर, प्रबुद्ध गायकवाड, निखिल गायकवाड, मयूर कांबळे, मुन्ना कांबळे, सोनू कसबे, अमोल राऊत, अनिल कसबे, इम्रान बागवान, सोमनाथ भाऊ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश देडे, अक्षय रणदिवे, अविनाश वैरागे, सतीश ताटे, पांडुरंग कदम, लहुजी शक्तीसेना कळंब तालुका प्रमुख विकास गायकवाड, बालाजी गायकवाड, जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष, विठ्ठल ताटे, बापू कसबे, सिकंदर वैरागे, सुनील देडे, कुंदन कदम, आनंद कदम, धनेश ताटे, अजय वैरागे, महेश ताटे, आकाश ताटे, प्रणव गायकवाड, सूरज कदम, अमोल कसबे, अमोल ताटे, विकास रणदिवे, संदीप कदम, साई कांबळे, ऩेहाल गायकवाड बालाजी कसबे, तानाजी वैरागे, आजय डिकुळे, आप्पा गायकवाड, अक्षय पेठे, शंकर ताटे आदी उपस्थित होते.

या शिबिरास आ. कैलास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे, शहराध्यक्ष प्रदीप मेटे, सागर बाराते, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र समन्वयक अतुल गायकवाड, जिल्हाअध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी आदींनी भेट देऊन रक्तदात्यांना श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमाणपत्र वितरित केले.

Web Title: Response to blood donation camp at Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.