जिल्हाभरातील ४२८ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली हाेती. निवडणुकीवर हाेणारा खर्च तसेच निवडणुकीनंतर हाेणारे तंटे लक्षात घेऊन निवडणुका बिनविराेध काढण्याचे आवाहन प्रशासनासह लाेकप्रतिनिधींकडून करण्यात आले हाेते. या आवाहनास प्रतिसाद देत जिल्हाभरातील ३९ ग्रामपंचायती बिनविराेध काढण्यात ग्रामस्थांना यश आले. त्यामुळे उर्वरित ३८२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान घेण्यात आले.१८ जानेवारी राेजी निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षण साेडतीकडे लागल्या आहेत. अखेर शुक्रवारी आरक्षण साेडत जाहीर करण्यात येणार आहे. वाशी, कळंब, परंडा, लाेहारा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण साेडत तहसील कार्यालयात हाेईल. उस्मानाबाद येथील महसूल भवन, भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालय, उमरगा येथील पंचायत समिती सभागृह तर तुळजापूर तालुक्यातील सरपंचपदाची साेडत श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्पाेर्ट्स हाॅल येथे सकाळी ११ वाजता सुरू हाेईल, असे कळविले आहे.
४२८ ग्रापंचायत सरपंचपदासाठी उद्या आरक्षण साेडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST