उस्मानाबाद : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७१ वा वर्धापन दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, संस्था आदी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, प्रतिमा पूजन तसेच संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन आदी कार्यक्रम पार पडले.
येथील तुळजाभवानी क्रीडांगणावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री शंकरराव गडख यांच्या हस्ते झाला. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जि. प. अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नेवारे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री गडाख यांच्या हस्ते उत्कृष्ट तपासाबाबत केंद्रीय गृहमंत्री पदक मिळाल्याबद्यल पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, उत्तम सेवेबद्दल पोलीस महासंचालक पदकप्राप्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा, तसेच महाराजस्व अभियानात पाणंद रस्ते, शेत रस्ते, अतिक्रमण मुक्तीचे काम उत्कृष्टपणे केल्याबद्यल उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, ढोकीचे मंडळ अधिकारी एन. डी. नागटिळक, गोवर्धनवाडीचे तलाठी सतीश तांबारे, कोरोना महामारीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्यल कोरोना योध्दा म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डी. के. पाटील आणि इतर दहा वैद्यकीय अधिकारी व परिसेवीका, जि.प. आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारीकां, नगर पालिकेतील लिपिक, सफाई कामगार, वाहनचालक, जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे २०१७-१८ आणि २०१८-१९ चे जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्ता, समाज कल्याण विभागाने घेतलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तच्या निबंध स्पर्धेतील विजेते, कृषि विभागाच्या योजना यशस्वीपणे राबविण्याचे काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नूतन विद्यामंदिर
उस्मानाबाद : येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिरात मुख्याध्यापक प्रदीपकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी प्रतिमा पूजन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहीक वाचन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव पडवळ, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, संस्था सदस्य तथा नगरसेविका प्रेमाताई पाटील, माजी प्राचार्य सुधीर पडवळ, शिक्षण समन्वयक किसन हजारे, संतोष कुलकर्णी, बाळासाहेब घोलप, स्वप्निल पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शितल उटगे यांनी केले तर आभार तृप्ती तिकोणे यांनी मानले.
पोदार इंटरनॅशनल स्कूल
उस्मानाबाद : येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्राचार्य आनंद कुमार शाह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिक्षकांनी ध्वजाला मानवंदना देऊन देशभक्तीवर आधारित गीते सादर केली. कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी स्वप्नील जुमडे, पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका शिला टाक, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक रेश्मा संकपाल, समन्वयक निशिद चौधरी, प्रशांत कडेकर, सुप्रिया राहीगुडे आदींनी पुढाकार घेतला.
भारत विद्यालय, उमरगा
उमरगा : येथील भारत विद्यालयात मुख्याध्यापक शाहुराज जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक व्रिक्रांत मोरे, संजय देशमुख, भारत प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर दासिमे, सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानोबा ढोणे, एकनाथ गायकवाड, तुकाराम पितळे, सी. जी. शिंदे आदी उपस्थित होते. शिक्षक व्यंकट गुंजोटे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विषद करुन भारतीय संविधानाचे वाचन केले.