शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

'राष्ट्रपती' सुटले, मात्र 'पंतप्रधान' जन्म दाखल्यासाठी अडकले लाल फितीच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 18:58 IST

पहिल्या मुलाचा ‘राष्ट्रपती’चा जन्म नोंद दाखला मिळाला असून या नावाने आधार कार्डही आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : होय, हे खरंय ! पंतप्रधानांचा जन्म दाखला लाल फितीत अडकून पडलाय. त्याचे झाले असे, चिंचोली (भु.) येथील एका दाम्पत्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवले होते. तर महिनाभरापूर्वी जन्मलेल्या दुसर्या बाळाचे नाव पंतप्रधान ठेवले. राष्ट्रपतीला जन्म दाखला मिळाला. मात्र, पंतप्रधान हे संविधानिक पदनाम असल्याचे सांगत त्याचा जन्म दाखला लटकून ठेवण्यात आला आहे.

चिंचोली भु. (जि.उस्मानाबाद) येथील दत्ता व कविता चौधरी या दाम्पत्याने १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले होते. या नावाचा जन्म दाखलाही त्यांना मिळाला. तसे आधारकार्डही त्यांनी बनविले आहे. यानंतर १० नोव्हेंबर २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरामणी (जि.सोलापूर) येथे त्यांना दुसरे बाळ झाले. या बाळाचे नाव त्यांनी रिवाजाप्रमाणे बारसे घालून “पंतप्रधान” असे ठेवले आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयात दत्ता चौधरी यांनी पंतप्रधानांचा जन्म दाखला मिळण्याकरिता २७ नोव्हेंबर रोजी अर्ज सादर केला आहे.परंतु, ''पंतप्रधान'' हे संविधानिक पदनाम असल्यामुळे हे नाव बालकास द्यावे किंवा कसे, याबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी आरोग्य केंद्राने सोलापूरच्या जिल्हा निबंधक, जन्म-मृत्यु तथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे १ डिसेंबर रोजी पत्र पाठवले. यास आता महिना उलटून गेला तरी ना मार्गदर्शन मिळेना, नाही जन्म दाखला. इकडे पंतप्रधानांचे पालक दत्ता चौधरी मात्र, सातत्याने आरोग्य केंद्राचे खेटे घालत आहेत.

अधिकारी टोलवाटोलवी करीत आहेतमाझ्या पहिल्या मुलाचा ‘राष्ट्रपती’चा जन्म नोंद दाखला मिळाला आहे. या नावाने आधार कार्डही बनवून घेतले आहे. परंतु दुसऱ्या मुलाचे ''पंतप्रधान'' हे नाव संविधानिक असल्यामुळे हे नाव बालकास द्यावे किंवा कसे याबाबत आता मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. याबाबत काहीच ठोस निर्णय कोणी घेईना. सर्व अधिकारी टोलवाटोलवी करीत दुसऱ्याकडे बोट दाखवत आहेत.- दत्ता चौधरी, पालक

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादGovernmentसरकार