शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

उस्मानाबादेत राजकीय भूकंपाचा मुहूर्त ठरला;रविवारी महाजनादेश यात्रेत राणा पाटलांचा भाजप प्रवेश ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 19:24 IST

माजी मंत्री राणा पाटील भाजपच्या वाटेवर

ठळक मुद्देपवार कुटूंबियांशी रक्ताचे नाते़़़‘मला तुमच्याशी काही बोलायचंय’ अशा मथळ्याखाली पोस्ट

उस्मानाबाद : मराठवाड्यातील बहुचर्चित पक्षांतर मूर्त स्वरुप घेण्याच्या मार्गावर आहे़ शरद पवारांचे खंदे समर्थक डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव माजी मंत्री आ़राणा पाटील हे भाजपच्या वाटेवर असून, रविवारी उस्मानाबादेत दाखल होत असलेल्या महाजनादेश यात्रेत त्यांचा प्रवेश नक्की मानला जात आहे़

गेल्या महिनाभरापासून राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरु आहे़ मात्र, त्यांनी दोनवेळा या चर्चेचे खंडन केले होते़ लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा नसतानाही त्यांना शरद पवारांच्या आग्रहाखातर ही निवडणूक लढवावी लागली होती़ ज्यात ते मोठ्या फरकाने पराभूत झाले होते़ सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेत त्यांनी वेगळा मार्ग निवडण्याचे निश्चित केल्याचे दिसते़ गुरुवारी सायंकाळी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन प्रसारित झालेला एक संदेश कार्यकर्त्यांना पक्षांतराचाच संदेश देऊन गेला़ ‘मला तुमच्याशी काही बोलायचंय’ अशा मथळ्याखाली त्यांनी कार्यकर्त्यांना ३१ आॅगस्ट रोजी उस्मानाबाद येथे संवाद साधण्यासाठी निमंत्रित केले आहे़ सोबतच त्यांनी दीर्घ अशी पोस्टही लिहिली आहे़ त्यातून भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे़ ‘आजवर जी मायेची उब आणि सक्षम साथ आपण सर्वांनी दिली, यापुढेही ती अशीच राहील, असा माझा दृढ विश्वास आहे़़़ प्रामाणिक कामासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात़़़बदलत्या नैसर्गिक, भौगोलिक व राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या निरंतर विकासासाठी काही निर्णय घेणे अपेक्षित आहेत़़़’ असे सांगत राणा पाटील यांनी राष्ट्रवादी सोडण्याचे सूचक संकेत दिले आहेत़ विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १ सप्टेंबर रोजी उस्मानाबादेत दाखल होत आहे़ त्याच्या एक दिवस आधीच म्हणजेच ३१ आॅगस्ट रोजी निर्णय घेण्यासंदर्भात राणा पाटील यांनी जाहीर संवाद आयोजित केला आहे़ त्यामुळे ते महाजनादेश यात्रेतच भाजप प्रवेश करु शकतात, अशी अटकळ आहे़ तसे झाल्यास राष्ट्रवादीसाठी हा फार मोठा धक्का असणार आहे़

पवार कुटूंबियांशी रक्ताचे नाते़़़माजी गृहमंत्री डॉ़पद्मसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य असून, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात़ शिवाय, त्यांचे कौटुंबिक नातेसंबंध आहेत़ माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार हे डॉ़पाटील यांचे सख्खे मेहुणे आहेत़ आजघडीला राष्ट्रवादीतून अनेक नेते भाजप-सेनेत उड्या मारत असले तरी, राणा पाटलांचे पक्षांतर हे पवार कुटूंबियांच्या जिव्हारी लागणारे आहे़

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राBJPभाजपाOsmanabadउस्मानाबाद