शांतता कमिटीच्या बैठकीला सुरूवात हाेण्यापूर्वी नूतन पाेनि सुनीलकुमार काकडे यांचा सत्कार सरपंच प्रतिनिधी धनराज सुभेदार यांनी केला. यावेळी एस. एस. पांचाळ, एस. बी. साखरे, लक्ष्मण भाेपळे, माजी सरपंच सदानंद बिरादार, माजी सरपंच गणेश पाटील, माजी उपसरपंच प्रकाश सुभेदार, उपसरपंच सिराज शेख, पंचायत समिती सदस्य बस्वराज शिंदे, संजय माळी, नागनाथ यमगर, महादेव माळी, हरिभाऊ चव्हाण, निळकंठ राठोड, गिरमल दलाल, ज्ञानेश्वर शिंदे, तिपय्या स्वामी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना पाेनि काकडे म्हणाले की, काेराेना विषाणूचा संसर्ग काही अंशी कमी झाला आहे. परंतु, धाेका अद्याप काही टळलेला नाही. ही बाब लक्षात घेता, यंदाचा गणेशाेत्सव शांततेत व साधेपणाने साजरा करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने गणेशाेत्सव आपल्या घरातच साजरा करून पाेलीस यंत्रणेसह प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन ईश्वर सुरवसे यांनी केले. तर आभार नागनाथ यमगर यांनी मानले.