शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत डॉ. करजंकर यांच्या घरी सशस्त्र दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:27 IST

मारहाण करून दरोडेखोरांनी सोने, रोकड लांबविली

उस्मानाबाद : येथील प्रसिद्ध डॉ. सुरेश करंजकर यांच्या राहत्या घरी शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी मारहाण करून मोठ्या प्रमाणात सोने व रोकड लंपास केली आहे.

दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात डॉ. करंजकर यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी स्वत: घटनास्थळास भेट दिली. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद शहरातील समर्थनगर भागात प्रसिद्ध डॉ. करजंकर यांचे घर तसेच हॉस्पिटलही आहे. याच घरावर शनिवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडला. अज्ञात दहा ते पंधरा सशास्त्र दरोडेखोरांनी घराच्या गेटवरून उड्या मारून आत प्रवेश केला.

यावेळी घराचा समोरचा दरवाजा बंद होता. त्यामुळे दरोडेखोरांनी दरवाजाचा कडी-कोंडा उचकटून घरात प्रवेश मिळविला. तलवार तसेच अन्य धारदार शस्त्रांचा धाक दाखवून खोल्यांतील कपाटांमध्ये ठेवलेला ऐवज तसेच तिजोरी फोडून त्यातील मोठ्या प्रमाणात सोने, रोकड लांबवली. दरम्यान, दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात डॉ. करजंकर यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. सशस्त्र दरोड्यामुळे उस्मानाबाद शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या. घरासमोरील सीसीटीव्ही तसेच परिसरातील अन्य सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचेही त्यांनी अधिकाºयांना निर्देश दिले आहेत.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसOsmanabadउस्मानाबाद