शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

उस्मानाबाद जनता बँकेला चाळीस कोटींवर नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक अस्थिरता, औद्योगिक क्षेत्रात मंदीची लाट, गुंतवणुकीवरील ...

उस्मानाबाद : कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक अस्थिरता, औद्योगिक क्षेत्रात मंदीची लाट, गुंतवणुकीवरील व्याजदरात सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीतही उस्मानाबाद जनता सहकारी बँकेने सन २०२०-२१मध्ये ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा मिळवल्याची माहिती अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी यांनी दिली.

राज्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, सोलापूर व अहमदनगर जिल्हा आणि कर्नाटक राज्यातील बीदर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या उस्मानाबाद जनता बँकेची सर्वसाधारण सभा रविवारी पार पडली. यावेळी मोदाणी बोलत होते. बँकेने ३१ मार्च २०२१ अखेर २,८०० कोटी व्यवसाय वाढीचा टप्पा पूर्ण केला असून, चालू आर्थिक वर्षात तीन हजार कोटींपेक्षा जास्त बँकिंग व्यवसाय पूर्ण करण्याचा निर्धार केल्याचे सांगून रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीने ८ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचे मोदाणी यांनी जाहीर केले.

सद्यस्थितीत बँकेच्या राज्यात २८ तर कर्नाटकात दोन अशा एकूण ३० शाखा कार्यरत आहेत. यातील १५ शाखा कार्यालये ही बँकेच्या स्वमालकीच्या इमारतीत सुरू आहेत. बँकेकडून ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेत विविध ऑनलाईन सुविधा तसेच मागणीनुसार एटीएम कार्डदेखील देण्यात येत आहे. बँकेच्या अधिकृत भागभांडवलाची मर्यादा १०० कोटी झाली आहे. त्यामुळे एका भागाची किंमत १००वरून पाचशे रुपये करण्यात आली असून, सर्व भागधारक सभासदांनी याची नोंद घेऊन अपूर्ण भागाची रक्कम त्वरित आपल्या जवळच्या बँक शाखेत भरणा करावी, असे आवाहनही मोदाणी यांनी यावेळी केले.

प्रास्ताविक माजी अध्यक्ष विश्वास शिंदे यांनी केले. या सभेला बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत नागदे, भागवतराव धस, संजय दुधगावकर, बाळासाहेब शिंदे, संजय पाटील, श्रीकिशन भन्साळी, रवी ओझा, राजाभाऊ जंत्रे, नानासाहेब निंबाळकर, उदयभानू हलवाई, व्यंकटेश मोईंदे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शोभा वारद, सरव्यवस्थापक एम. बी. गायकवाड व कर्मचारी उपस्थित होते. बँकेचे उपाध्यक्ष आमदार वैजीनाथ शिंदे यांनी आभार मानले.