शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पोरक्या नम्रताला आजी-मावशीचा खंबीर आधार, तीने ५ महिन्यात पटकावल्या ४ सरकारी नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 16:57 IST

नम्रता पौळचा सरकारी नोकरीचा 'चौकार'; पाच महिन्यांत आली चौथ्या पोस्टची ऑर्डर 

कळंब ( धाराशिव) : नम्रता दत्तात्रय पौळ या अवघ्या २४ वर्षे वयाच्या मुलीने स्पर्धा परीक्षा देत एकाच महिन्यात दोन पोस्ट ‘क्रॅक’ केल्याचे कौतुक होत असतानाच सलग दुसऱ्या महिन्यात लोकसेवा आयोगाची तिसरी पोस्ट काढली होती. आता तर तिच्या नावे आणखी एक ‘रेकॉर्ड’ झालं असून, लोकसेवा आयोगाच्या ‘सब रजिस्टार’ पदाला गवसणी घालत अवघ्या पाचव्या महिन्यात यशाचा चौकार’ तिने लगावला आहे.

नम्रता दत्तात्रय पौळ ही मूळ राहणार वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील असली तरी तिचा हल्ली मुक्काम कळंब तालुक्यातील आंदोरा येथे आहे. जिद्दी व कष्टाळू नम्रताने अवघ्या पाच महिन्यांत शासनाच्या विविध विभागांच्या चार स्पर्धा परीक्षेत ‘पोस्ट क्रॅक’ करत अद्वितीय असे मिळविलेले यश. नम्रताचे मार्गदर्शक व समर्थ फाउंडेशनचे प्रमुख प्रा. बनेश्वर शिंदे सांगतात की, अतिशय मितभाषी असलेली नम्रता इतर विद्यार्थ्यांसाठी एक ‘आयडॉल’ आहे. सातत्यपूर्ण अभ्यास हे तिच्या यशाचे गमक आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुणे, मुंबई न गाठता खेड्यात केला अभ्यासलहानपणीच मातापित्यांचे छत्र हरवलेल्या नम्रता आणि तिच्या भावंडांचा सांभाळ  आंदोरा येथील आजी चंद्रभागा तांबारे व मावशी छाया अशोक पाटील हे मोठ्या मायेने करत आहेत. याच बळावर आपल्या दोन भावंडांसह नम्रता खंबीरपणे स्पर्धेला तोंड देत स्वयंसिद्धा ठरली आहे. आंदोरा येथील जि. प. प्राथमिक शाळेत प्राथमिक, कळंब येथील सावित्रीबाई फुले शाळेत माध्यमिक व उच्चमाध्यमिक तर छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण तीने घेतले आहे. विशेष म्हणजे, नम्रताने पुणे, मुंबई न गाठता आंदोरा या खेड्यात वास्तव्य करत स्पर्धा परीक्षेत हे यश मिळवले आहे.

पाच महिन्यात चार सरकारी पोस्टवर नियुक्तीनम्रता पौळची प्रथम २०० पैकी १९६ गूण घेत बीड येथे २४ जानेवारी रोजी तलाठी पदावर नियुक्ती झाली. यानंतर १३ मार्चला तीची एमपीएसीमार्फत विक्रीकर अधिकारी पदी निवड झाली. या यशाचे कौतुक होत असतानाच अवघ्या तीस दिवसात सहाय्यक कक्ष अधिकारी आणि मंगळवारी ‘सब रजिस्टार’ या वर्ग दोन पदावर नम्रताची निवड झाल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMPSC examएमपीएससी परीक्षा