शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण’; कळंबमध्ये मराठा महामोर्चाची तयारी जोरात

By बाबुराव चव्हाण | Updated: September 16, 2022 17:20 IST

कळंब येथे पंधरा दिवसांपासून सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य अशा मराठा मोर्चाचे आयोजन सुरू आहे.

कळंब (जि. उस्मानाबाद) -‘‘एकच मिशन, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण’’ असा नारा देत कळंब येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सोमवारी ‘‘मराठा महामोर्चा’’ आयोजीत करण्यात आला आहे. यासंबंधी मराठा समाजाच्या गावोगावी स्वयंस्फूर्तीने बैठका होत आहेत.

कळंब येथे पंधरा दिवसांपासून सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य अशा मराठा मोर्चाचे आयोजन सुरू आहे. याची तयारी अंतीम टप्यात आली आहे. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे अन् तेही ओबीसी प्रवर्गातील ५० टक्केच्या आतमधील आरक्षण द्यावे, अशी या आंदोलनातील प्रमुख मागणी आहे. यासाठी कोणत्याही राजकीय किंवा संघटनात्मक व्यासपीठाचा वापर न करता सकल मराठा समाजाने एकीची मूठ आवळत आरक्षण मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. यासाठी गावनिहाय समाजबांधवांच्या बैठका अंतिम टप्यात आल्या आहेत. मोर्चाची आचारसंहिता जाहीर करत, त्याविषयी गावबैठकात मोर्चात सहभागी होणार्यांना अवगत करण्यात आले आहे. १९ सप्टेंबर राेजी सकाळी १० वाजता विद्याभवन हायस्कूलच्या प्रांगणातून प्रांरभ झालेला मोर्चा नगर परिषद शाळेच्या प्रांगणात स्थिरावणार आहे. तद्नंतर पाच विद्यार्थीनी केवळ पाच मिनिटांचे प्रातिनिधिक भाषण करून उपविभागीय अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देणार आहेत. यापार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सतर्क झाली असून आवश्यक त्या चोख व्यवस्थेचे नियोजन केले आहे.

अशी आहे मोर्चाची आचारसंहिता:मोर्चा शांततेत, निश्चित केलेल्या मार्गानेच निघेल.कोणत्याही पक्ष ,संघटना, व्यक्तींच्या विरोधात किंवा समर्थन घोषणा दिल्या जाणार नाहीतप्रथम विद्यार्थिनी, तद्नंतर महिला, विद्यार्थी,सर्वसामान्य जनता व शेवटी राजकीय,संघटनेचे पदाधिकारी राहतील.प्रत्येकास पोलीस, समन्वयक व स्वंयसेवकांच्या सूचनांचेे तंतोतंत पालन करावे लागेल.सभास्थळी आल्यावर कोणत्याही बोलण्याची संधी मिळणार नाही. सर्वांना रांगेमध्येच चालावे लागेल.ठराविकच घोषणा, त्यापण केवळ स्वंयसेवक देतील,त्यास सर्वांचा प्रतिसाद असेल.मोर्चा सीसीटीव्ही, ड्रोनच्या निगरानीखाली असेल, गैरवर्तन दिसल्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल

अशी असेल पार्किंग व्यवस्थायेरमाळा, वाशी, बार्शी - पंचायत समिती समोरील पोलीस मैदान.ढोकी, मुरूड, शिराढोण- केंब्रिज शाळा व मोहेकर क्रीडा संकुल डिकसळकेज, आंबाजोगाई - रणसम्राट क्रिडागंण, १०१ नगर मैदानभोगजी, नांदूर, आथर्डी- जि.प.कन्या प्रशाला मैदानमोहा, खामसवाडी, येडशी-जि.प.मुलांची प्रशाला मैदान.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMaratha Reservationमराठा आरक्षण