लक्ष्मण होनाळकर हे गेल्या २५ वर्षांपासून जिल्हा व परिसरात कंपनीचे काम करीत असून, आतापर्यंत हजारो ग्राहकानी सोलार वॉटर हिटरचा उपयोग करुन ऊर्जा बचत तसेच पैशाची बचत करुन समाधान व्यक्त केले आहे. सुदर्शन सौर ही अंतराष्ट्रीय दर्जा असलेली उत्पादने बनविण्यात अग्रेसर असून, मागील ३२ वर्षे सतत नवनवीन तंत्रज्ञानासह आगेकूच करीत आहे. ‘ग्लास लायनिंग’ या वैशिष्टपूर्ण तंत्रज्ञानामुळे कोणत्याही प्रकारचे खारे /गोडे पाणी वापरले तरी ही सोलार वॉटर हिटर दीर्घ काळ टिकते. कंपनीने या मॉडेलला १० वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी देऊ केलेली आहे.
भारतातील सर्वाधिक खपाबद्दल तसेच सर्वाधिक विक्री जाळे बनविण्याबद्दल भारत सरकारकडून गौरविण्यात आलेली एकमेव कंपनीची ओळख या कंपनीने प्राप्त केली आहे. ग्राहकांनी नवीन डिस्काऊंड ऑफरचा लाभ घ्यावा, असे आवाहन लक्ष्मण होनाळकर यानी केले आहे. (वाणिज्य वार्ता)