शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

‘एमबीबीएस’धारक डाॅक्टर देता का डाॅक्टर; ५० टक्के आराेग्य केंद्रांना डाॅक्टरांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 16:47 IST

‘एमबीबीएस’धारक डाॅक्टरांच्या तब्बल ५० टक्के जागा रिक्त आहेत. याचा आराेग्य सेवेवर विपरित परिणाम हाेऊ लागला आहे.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी एक एमबीबीसधारक व एक ‘बीएएमएस’धारक डाॅक्टर आहेत.काही आराेग्य केंद्रांना एकही एमबीबीएसधारक डाॅक्टर नाहीत.

उस्मानाबाद : मध्यंतरी काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर सर्व काही सुरळीत हाेऊ लागले आहे, असे वाटत असतानाच पुन्हा काेराेना विषाणूने डाेके वर काढले आहे. रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ हाेऊ लागली आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील आराेग्य यंत्रणेवर ताण येत आहे. असे असतानाच दुसरीकडे जिल्हा परिषद आराेग्य केंद्रातील ‘एमबीबीएस’धारक डाॅक्टरांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे ‘एबीबीएस’धारक डाॅक्टर देता का डाॅक्टर, असे म्हणण्याची वेळ आता खुद्द जिल्हा आराेग्य यंत्रणेवर येऊन ठेपली आहे.

काेराेनाचा उद्रेक वाढल्यानंतर शासनाने आराेग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला. या माध्यमातून भाैतिक सुविधा वाढल्या. उपकेंद्रांना ‘बीएएमएस’धारक डाॅक्टरही देण्यात आले आहेत. परंतु, दुसरीकडे ‘एमबीबीएस’धारक डाॅक्टरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रांसाठी दाेन या प्रमाणे ८२ ते ८३ जागा मंजूर आहेत. काही वर्षांपूर्वी या जागा फुलफिल हाेत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आराेग्य सेवा मिळत हाेती. मात्र, ऐन काेराेना संकटाच्या काळात डाॅक्टरांची वानवा निर्माण झाली आहे. ‘एमबीबीएस’धारक डाॅक्टरांच्या तब्बल ५० टक्के जागा रिक्त आहेत. याचा आराेग्य सेवेवर विपरित परिणाम हाेऊ लागला आहे. यातून मार्ग काढण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद आराेग्य विभागाने अनेक ठिकाणी एक एमबीबीसधारक व एक ‘बीएएमएस’धारक डाॅक्टर दिले आहेत. तरीही डाॅक्टरांची संख्या कमी पडत आहे. काही आराेग्य केंद्रांना एकही एमबीबीएसधारक डाॅक्टर नाहीत. त्यामुळे अशा ठिकाणी एखाद्या दगावलेल्या व्यक्तीस पाेस्टमार्टेमसाठी आणल्यास अनंत अडचणींना ताेंड द्यावे लागते. लगतच्या आराेग्य केंद्रातील डाॅक्टरांना पाचारण करावे लागते. अनेकवेळा नातेवाईकांना तासनतास ताटकळत बसावे लागते. अशावेळी शाब्दिक खटकेही उडतात. त्यामुळे वेळीच डाॅक्टर भरण्याची गरज आहे.

एक ‘एमबीबीएस’ व दुसरे ‘बीएएमएस’डाॅक्टर द्यावेतजिल्हा परिषदेतील अनेक पदाधिकारी आपल्या मतदार संघातील प्राथमिक आराेग्य केंद्रास ‘एमबीबीएस’ डाॅक्टर मिळावेत, यासाठी आग्रही आहेत. परंतु, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. वडगावे यांच्याकडेही अन्य पर्याय नाहीत. दरम्यान, सध्या काही सदस्यांनी प्रत्येक आराेग्य केंद्रात एक ‘एमबीबीएस’ व दुसरे ‘बीएएमएस’डाॅक्टर द्यावेत, अशी सूचना मांडली आहे. ज्यामुळे डाॅक्टरांची चणचण कमी हाेईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यावरही विचार सुरू असल्याचे सूत्रांनी म्हटले.

पाठपुरावा सुरू‘एमबीबीएस’ डाॅक्टर मिळावेत, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. नेहमी पत्रव्यवहार केला जात आहे. संबंधित डाॅॅक्टर उपलब्ध हाेताच, नियुक्ती देण्यात येईल.-डाॅ. हणमंत वडगावे, जिल्हा आराेग्य अधिकारी.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादdoctorडॉक्टर