(फोटो : अंकुश अंधारे १०)
माणकेश्वर : भूम तालुक्यातील वांगी (बुद्रुक) ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला असून, सरपंचपदी रेणुका शिवाजी गुंजाळ तर उपसरपंचपदी अतुल भालचंद्र माळी यांची बिनविरोध निवड झाली.
ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत अजिनाथ पालके यांनी रा.काँ.च्या वतीने ह.भ.प धोंडोपंत दादा ग्रामविकास पॅनल, तर शिवसेना पुरस्कृत संत मुक्ताबाई ग्रामविकास पॅनल यांच्यामध्ये सरळ लढत झाली होती. यात नऊपैकी सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला होता. बुधवारी झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडीमध्ये अध्यासी अधिकारी म्हणून पी.बी. सातपुते यांनी काम पाहिले, तर ग्रामसेवक टी.एम. पुराणिक यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी विशाल टकले, तानाजी गुंजाळ, श्रीरंग माळी, रामा गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, प्रदीप म्हेत्रे, बालाजी शेळके, हनुमंत झील, नरसिंग शेळके, महादेव माळी, भालचंद्र माळी, भागवत म्हेत्रे, दत्ता गुंजाळ, नवनिर्वाचित सदस्य अमोल पालके, सोनाली वहील, उल्काबाई गौतम म्हेत्रे, मनिषा माळी, गणेश सांगडे आदी उपस्थित होते. या निवडीनंतर ह.भ.प धोंडीपंत दादा ग्रामविकास पॅनलच्या समर्थकांनी जेसीबीने गुलाल उधळून जल्लोष केला. नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा माजी जि.प. सदस्य आजिनाथ पालके यांनी सत्कार केला.