शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांची विजयी घोडदौड

By बाबुराव चव्हाण | Updated: November 21, 2022 19:06 IST

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

उस्मानाबाद : महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखताना पुरुषांनी उत्तराखंडवर तर महिलांनी अरुणाचल प्रदेशवर डावाने विजय साजरे केले.

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात २४ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्रने उत्तराखंडवर १७-७ असा १:१० मि. राखून डावाने धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या रामजी कश्यप व प्रतीक वाईकर (प्रत्येकी २:४० मि. संरक्षण व १ गुण), अक्षय मासाळ (२:१० मि. व ३ गुण), लक्ष्मण गवस (२:१० मि. संरक्षण व २ गुण), सुरज शिंदे (२:२० मि. संरक्षण) व गजानन शेंगाळ (३ गुण) यांनी आपल्या शानदार खेळाची झलक दाखवताना महाराष्ट्राला डावाने विजय मिळवून दिला. पराभूत उत्तराखंडच्या शशिकांतने एकहाती लढत दिली. महिलांच्या सामन्यात महाराष्ट्रने अरुणाचल प्रदेशचा १८-३ असा एक डाव १५ गुणांनी एकतर्फी धुव्वा उडवला.

महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळे (५ गुण), स्नेहल जाधव (नाबाद २ मि. संरक्षण व २ गुण), प्रतीक्षा बिराजदार (२:४० मि. संरक्षण), प्रीती काळे व श्रेया सनगरे (प्रत्येकी २:१० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (४ गुण), दीपाली राठोड (३ गुण), अपेक्षा सुतार व पूजा फरगटे (प्रत्येक २ गुण) यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्राला मोठा विजय मिळविणे सहज शक्य झाले. पराभूत अरुणाचल प्रदेशच्या प्रेमाने थोडीफार चांगली कामगिरी केली. महिलांच्या दुसऱ्या एका सामन्यात गोव्याने सीमा सुरक्षा बलचा १८-४ असा एक डाव १४ गुणांनी धुव्वा उडवला. गोव्याच्या काशी गावकरने (४:२० मि. संरक्षण व ३ गुण), अश्विनी वेळीपने (४:३० मि. व २ गुण), दीप्ती वेळीपने (नाबाद ४:३० मि. संरक्षण) करून विजयात मोलाची कामगिरी बजावली. तर पराभूत सीमा सुरक्षा बलच्या अश्विनी चव्हाणने एकाकी लढत दिली.

विदर्भ संघाने मिळवला एकतर्फी विजय...पुरुषांच्या सामन्यात विदर्भाने दुबळ्या जम्मू-काश्मीरवर २३-८ असा एकतर्फी विजय मिळवला. अक्षय उमाते, दिलराजसिंग सेनगर, राज सिसोदिया त्यांनी चांगला खेळ केला तर जम्मू-काश्मीरच्या कोणत्याही खेळाडूला विशेष प्रभाव पडता आला नाही. कोल्हापूरच्या महिलांनीसुद्धा जम्मू-काश्मीरचा ३२-६ असा एक डाव २६ गुणांनी धुव्वा उडवला. पुरुषांच्या सामन्यात कोल्हापूरने त्रिपुराचा २८-८ असा एक डाव २० गुणांनी पराभव केला.

अन्य निकाल :महिला गट : मध्य भारत वि. भारतीय तिबेट सीमा सुरक्षा बल २५-१ डावाने, हरियाणा वि. बिहार २७-४ डावाने, प. बंगाल वि. सीमा सुरक्षा बल २८-५ डावाने, दिल्ली वि. उत्तराखंड १९-५ डावाने, विदर्भ वि. छत्तीसगड ८-६ डावाने, ओडिशा वि. मणिपूर १८-३ डावाने यश मिळवले.

पुरुष गट : पंजाब वि. भारतीय तिबेट सुरक्षा बल २५-७ डावाने, प. बंगाल वि. चंडीगड १६-११ डावाने, ओडिशा वि. सीमा सुरक्षा बल १७-६ डावाने, भारतीय रेल्वे वि. २९-४ डावाने, मणिपूर वि. अरुणाचल प्रदेश १६-९ डावाने विजय मिळवला.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादKho-Khoखो-खो