शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

ओमराजेंच्या विजयात ‘नमो’ फॅक्टर महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 17:46 IST

शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्याचा राष्ट्रवादीचा ‘गेमप्लान’ यावेळीही अयशस्वी

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचा ९८ हजार मते घेत राष्ट्रवादीला धक्का प्रा़रवी गायकवाड यांचा पत्ता कापून ओम राजेनिंबाळकरांची उमेदवारी

- चेतन धनुरेलोकसभेच्या मैदानात शिवसेनेच्या गडाला सुरुंग लावण्याचा राष्ट्रवादीचा ‘गेमप्लान’ यावेळीही अयशस्वी ठरला आहे़ सेनेने खासदार प्रा़रवी गायकवाड यांचा पत्ता कापून ओम राजेनिंबाळकरांची घेतलेली ‘रिस्क’ यशस्वी ठरली़सव्वा लाखांच्या फरकाने त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आ़राणाजगजितसिंह पाटील यांना मात दिली़ ओमराजेंच्या या विजयात ‘नमो’ फॅक्टर चांगलाच चालला़

उस्मानाबाद लोकसभेसाठी शिवसेनेकडून ओम राजेनिंबाळकर तर राष्ट्रवादीकडून आ़ राणाजगजितसिंह पाटील हे दोघे चुुलतभाऊच आमनेसामने उभे होते़ दोन वेळा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात दंड थोपटून झाल्यानंतर यावेळी पुन्हा हे दोघे लोकसभेच्या आखाड्यात उतरले़ विद्यमान खासदार रवी गायकवाड यांचे तिकीट कापले गेल्याने त्यांचा रोष पत्करून राजेनिंबाळकर मैदानात उतरले होते़ अखेरच्या टप्प्यात तर खासदारांनी बदनामीचा गुन्हा दाखल करून ओमराजेंविरुद्ध उघड प्रचार केला़ मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले़ खासदार गायकवाड यांच्या होमपिचवरच (उमरगा) सेनेने जोरदार आघाडी घेतली़ मित्रपक्षांना सोबतीला घेऊन मोदी व केंद्र सरकारच्या कामगिरीवर सेना मतदारांना सामोरे गेली़ त्याला यश येऊन सेनेने हा गड पुन्हा जवळपास सव्वा लाखांच्या फरकाने जिंकला आहे़

काँग्रेस-राष्ट्रवादी  एकदिलाने लढलेआतापर्यंतच्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी कट्टर शत्रुत्व निभावणारी काँग्रेस यावेळी एकदिलाने मदतीला समोर आली होती़ राणा पाटील यांची छबी, राष्ट्रवादीचे अन् सोबतीला मित्रपक्षांचे बळ, शिस्तबद्ध प्रचार या जोरावर राणा पाटील यांना विजयाचा आत्मविश्वास होता़ मात्र, सव्वालाखाहून अधिक संख्येने वाढलेले नवमतदार आपल्याकडे वळविण्यात त्यांना यश आले नाही़ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांनीही तब्बल ९८ हजार ५७९ मते घेत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे़ पहिल्या फेरीपासूनच शिवसेनेचे ओम राजेनिंबाळकर यांना आघाडी मिळत गेली़ ती अखेरपर्यंत कायम राहिली़ 

स्कोअर बोर्डओम राजेनिंबाळकर यांना ५ लाख ९६ हजार ६४०, तर राणा पाटील यांना ४ लाख ६९ हजार ७४ मते मिळाली. राजेनिंबाळकर १ लाख २७ हजार ५६६ मतांनी विजयी झाले. मागच्याप्रमाणेच उस्मानाबाद, परंडा, उमरगा, तुळजापूर, बार्शी, औसा युतीच्या पाठीशी राहिले.

टॅग्स :osmanabad-pcउस्मानाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल