शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उमरगा येथे दगडाने ठेचून तरुणाचा खून; चार संशयितांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 18:59 IST

उमरगा शहरातील कोळीवाडा, काळे प्लॉट येथील पालिकेच्या बाजार मार्केटच्या परिसरात बुधवारी सकाळी दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केलेला २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : शहरातील मुळज रोडलगत काळे प्लॉट भागात एका २५ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. खुनाचे नेमके कारण मात्र स्पष्ट झाले नाही.

उमरगा शहरातील कोळीवाडा, काळे प्लॉट येथील पालिकेच्या बाजार मार्केटच्या परिसरात बुधवारी सकाळी दगडाने ठेचून चेहरा विद्रूप केलेला २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, सहायक निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, उपनिरीक्षक अमोल मालुसरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरून हा मृतदेह त्याच परिसरात राहणाऱ्या आकाश दत्तात्रय अबाचणे याचा असल्याची ओळख त्याच्या नातेवाइकांनी पटवली, तसेच चार- पाच जणांवर हा खून केल्याचा संशय व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला व संशयित चार आरोपींना अटक केली. मृतांचा नातेवाइकांनी सांगितलेले प्रमुख दोघे आरोपी फरार आहेत. दुपारी १ वाजेच्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक संजय पालवे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली, तसेच उस्मानाबाद येथून दुपारी श्वानपथक आल्यानंतर घटनास्थळी श्वान नेऊन घटनास्थळी सापडलेल्या चपलेचा वासावरून माग काढण्यात आला. यावेळी श्वानाने संशयित आरोपीच्या घरापर्यंत माग काढला. दरम्यान, सायंकाळपर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.

सावकारीचे कारण? नातेवाइकांचा ठिय्या...मृत आकाश व संशयित आरोपी आकाश धोत्रे, व्यकंट धोत्रे, प्रशांत पुरातले, विकास जाधव हे सावकारी करीत होते. यातूनच मृत व आरोपींमध्ये आर्थिक देवाणघेवाणीवरून मागील काही दिवसांपासून भांडणे होत होती. मृत आकाशला आरोपीकडून तू आमच्या ग्राहकास व्याजाने पैसे देत जाऊ नकोस, नाहीतर वाईट होईल, अशी सतत धमकी देत असत. त्यातूनच आरोपींनी हा खून केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला असून, गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी