शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला भेटण्यापूर्वीच प्रियकराचा खून; आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 19:39 IST

मृताच्या दुचाकीची व मोबाईलची तोडफोड करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला़ 

ठळक मुद्देउस्मानाबाद जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी केलेला खून

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील मोहा येथे अनैतिक संबंधातून एका व्यक्तीचा तीन वर्षांपूर्वी खून झाला होता़ यातील संजय मडके या आरोपीस अतिरिक्त सत्र न्या़एम़जी़ देशपांडे यांनी सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे़ 

मोहा येथील संजय दिलीपराव मडके याच्या पत्नीसोबत येथीलच श्रीरंग शाहू भोईटे याचे अनैतिक संबंध होते़ याची कुणकुण संजयला लागली होती़ ६ सप्टेंबर २०१७ रोजी श्रीरंग व संजयची पत्नी बाहेर भेटणार असल्याची माहिती संजयला मिळाली होती़ मात्र, तत्पूर्वीच त्याने श्रीरंग भोईटे यास दुचाकीवर बसवून शेतात नेले़ तेथे या दोघांत वाद झाला़ यावेळी संजयने त्याच्या अल्पवयीन मुलास लोखंडी कत्ती घेऊन येण्यास सांगितले़ कत्ती हाती पडताच त्याने श्रीरंगच्या मानेवर, हातावर वार करून जिवे मारले़ तो मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर संजयने श्रीरंगचा मृतदेह व त्याची दुचाकी मोहा शिवारातील एका उसाच्या शेतात नेऊन टाकले़ मयताच्या दुचाकीची व मोबाईलची तोडफोड करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला़ 

दरम्यान, याप्रकरणी १० सप्टेंबर २०१७ रोजी मयताचे वडील शाहू भोईटे यांच्या फिर्यादीवरुन येरमाळा ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी डॉ़ नितीन कटेकर यांनी केला़ यानंतर सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले़ अतिरिक्त सत्र न्या़एम़जी़ देशपांडे यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी चालली़ सोमवारी अंतिम सुनावणी झाली़ यादरम्यान, सरकारी पक्षातर्फे एकूण २० साक्षीदार तपासण्यात आले़ तसेच परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेता आरोपीस दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली़ तसेच १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षाही सुनावण्यात आली आहे़ सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड़शरद जाधवर यांनी काम पाहिले़