शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पालिका, नगरपंचायतींना मुलभूत सुविधासाठी करणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST

जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी ते बोलत ...

जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, आ. कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, जि. प. अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

मंत्री शिंदे म्हणाले, नगरपालिका व नगरपंचायती अंतर्गत नागरिकांना हक्काचे घर बांधताना अधिकाधिक सवलती दिल्या आहेत. ही नियमावली १ डिसेंबर २०२० रोजी मंजूर केली असून, ३ डिसेंबर २०२० पासून अंमलात आली आहे. या नियमावलीतील सुलभतेमुळे बांधकामाची गती वाढणार आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात एकसारखेपणा येणार असून, नगरपालिकांच्या पूर्वीच्या कामाचे वेगळेवेगळेपणामुळे नागरिकांना होणारा मनस्ताप थांबणार आहे, असे यावरील नगरविकास मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर यांनी शहराची २०२१ ची लोकसंख्या गृहीत धरून सध्याची पिण्याच्या पाण्याची योजना तयार केली आहे. परंतु, जिल्ह्यात सातत्याने पडणारा दुष्काळ आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन उजनी धरणातूनच संपूर्ण पाणी मिळावे, त्यासाठी वाढीव पाण्याची समांतर योजना मंजूर करावी, अग्नीशमन विभागासाठी ५ कोटी रूपयांचा निधी मिळावा, भुयारी गटार योजना मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात आहे त्या योजनेस लवकर मंजुरी मिळावी. भोगावती नदीस गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे नदीचे प्रदूषण कमी करून सुशोभीकरण करण्यासाठी निधी मिळावा, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांप्रमाणे न. पा. च्या शिक्षकांना वेतन मिळावे, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यास मंजुरी मिळावी. २०१३ पूर्वीच्या ६ मिटर रस्त्याच्या विकास नियमावलीतील घराच्या बांधकामासाठी मंजुरी देताना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात आदी मागण्या केल्या. त्यावर सर्व मागण्यांचा सकारात्मक निर्णय घेतला जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे नगरविकास मंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

चाैकट....

वाशी नगरपंचायतीसह उमरगा, तुळजापूर, परंडा पालिकेच्या अध्यक्षांकडून यावेळी आपापल्या शहरातील समस्या मांडण्यात आल्या. त्यावर नगरविकास विभागाशी संबंधित असलेल्या याेजनांचा तातडीने प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश दिले. प्रस्तावांना तातडीने मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरण तसेच उमरग्याच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचा विकास आराखडा सादर करावा त्यासही मंजुरी देऊ असे नगरविकास मंत्री शिंदे यांनी नमूद केले.