उस्मानाबाद : ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका फेरीवाल्याने त्यावर हल्ला केला. यात त्यांच्या हाताची बोटे कापली गेली, तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली. महिला अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्याचे जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले असून, कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन करीत या घटनेचा निषेध नोंदविला. हा केवळ एका अधिकाऱ्यावरील हल्ला नसून असे भ्याड हल्ले संपूर्ण नोकरशाहीसच जायबंदी करतात, असे म्हणत तुळजापुरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवीत कडकडीत काम बंद आंदोलन केले. या आंदोलनात प्रभारी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, कार्यालय अधीक्षक वैभव पाठक, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय साळुंके, अभंग गायकवाड, शिवरत्न अतकरे, इंदापूरकर, अरुणा रोकडे, प्रफुल्लता बरुरकर, शोभा कांबळे, जयश्री कांबळे आदी सहभागी झाले होते.
कळंब नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून या घटनेचा निषेध नोंदविला. यामुळे आज पालिकेत कोणतेही प्रशासकीय कामकाज झाले नाही. या आंदोलनामध्ये मुख्याधिकारी शैला डाके, कार्यालय अधीक्षक दीपक हारकर, एल. एस. वाघमारे, जरिचंद बावळे, गोविंद रणदिवे, हिंदुराव जगताप, रोकमवार, अभियंता कुलकर्णी, ठोके, महेश मुंढे, कल्याण गायकवाड, रमेश कदम, सुधीर चोंदे, सुनील हुलसूलकर आदींसह सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.
नळदुर्ग नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले. यावेळी पालिकेसमोर मांडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. कायद्याने दिलेल्या अधिकार व पदांची कर्तव्ये पार पाडताना तर प्राणघातक हल्ला होत असेल, तर अशा समाजकंटकावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. निवेदनावर नगर परिषद कर्मचारी व अधिकारी संघटनेचे नळदुर्गचे अध्यक्ष दीपक कांबळे, उपाध्यक्ष मुनीर शेख, सचिव मुकुंद भूमकर, कोषाध्यक्ष अजय काकडे, सूरज गायकवाड, समीर मोकाशी, सुशांत भालेराव, हरिभाऊ फंड, फुलचंद सुरवसे, चंदू नागणे, सतीश आकाडे, राणूबाई सपकाळ, शहाजी येडगे, अण्णाराव जाधव, भिमसेन भोसले, दीपक कौरव, तानाजी गायकवाड आदींच्या आहेत.
उमरगा नगर परिषद कर्मचाऱ्यांनीही कामबंद आंदोलन करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पालिका प्रशासनास दिले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक तुळशीदास वराडे यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी ए. बी. सानप, विवेक शाहीर, दाडगे एस. एच, राजन वाघमारे, अंकुश माने, दिनेश राऊत, सुरेश भोसले, शेषराव भोसले, करबस शिरगुरे, मंजूर शेख, अमोल अंगरखे, बी. जी. गायकवाड, यल्लापा दंडगुले, बालाजी जाधव, गिण्यानबाई कांबळे, शालूबाई दुनंगे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
मुरूम येथेही पालिकेसमोर तीव्र निषेध व्यक्त करून कामकाज दिवसभर बंद ठेवण्यात आले. यावेळी पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक यू. जे. देशपांडे, सहायकनगर रचनाकार विक्रम देवकर, यांच्यासह पालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
लोहारा नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करीत संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन दिले. या आंदोलनात जगदीश सोंडगे, अभिजित गोरे, दीपक मुंडे, सुमित पाटील, नावेद सय्यद, कमलाकर मुळे, नवनाथ लोहार, गणेश काडगावे, विलास भरारे, मातीन शेख, श्रीशैल मतकरी, उमाकांत सगट आदी सहभागी झाले होते.
भूम पालिकेतील कर्मचाऱ्यांनीही या घटनेतील आरोपींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करीत आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी पालिका कर्मचारी तुकाराम माळी, धर्मेंद्र गजभिये, रवी भोसले, ज्ञानेश्वर टाकले, प्रकाश गाढवे, प्रदीप नाईकवाडी, राजकुमार अहेरकर व शिराळकर उपस्थित होते.