शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

उस्मानाबादेत दिशा समितीच्या ६० टक्के बैठकांना खासदारांची दांडी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 18:17 IST

सहा बैठकांना समितीचे अध्यक्ष असलेले खा. रविंद्र गायकवाड यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देविकासाला ‘दिशा’ मिळणार कशी? पाच वर्षात २० ऐवजी दहाच बैठका

उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या वतीने ग्रामीण तसेच शहरी भागाच्या विकासासाठी २२ ते २४ योजना राबविल्या जातात. सदरील योजनांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी व्हावी, यासाठी दिशा समितीच्या माध्यमातून दर तीन महिन्याला आढावा घेणे अपेक्षित आहे. त्यानुसार पाच वर्षात २० बैठका घेणे बंधनकारक असताना आजवर केवळ १० बैठका झाल्या. यापैकीही सहा बैठकांना समितीचे अध्यक्ष असलेले खा. रविंद्र गायकवाड यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे. असे असतानाच मागील सहा महिन्यांत एकही बैठक झालेली नाही, हे विशेष.

केंद्र सरकारच्या वतीने  सर्वसामान्यांच्या विकासासाठी रोजगार हमी, दिन दयाळ अंत्योदय, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय  सामाजिक सहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत मिशन सारख्या २० ते २२ योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधीचा निधी मंजूर असतो. सदरील योजना पूर्ण क्षमतेने राबविल्या जातात की नाही, याचा आढावा घेण्यासाठी सरकारने दिशा समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्षपद खासदार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. खासदारांनी दर तीन महिन्याला बैठका घेऊन योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे अपेक्षित आहे. परंतु, मागील पाच वर्षातील समितीच्या कार्यपद्धतीबाबत चित्र पाहिले असता, विदारक वास्तव समोर येते.

पाच वर्षांमध्ये किमान २० बैठका होणे अपेक्षित होते. परंतु, ज्यांच्यावर जिल्ह्याच्या विकासाची धुरा आहे, त्यांनाच बैठका घेण्यास वेळ नाही की काय म्हणून ५० टक्के म्हणजेच अवघ्या दहा बैठका झाल्या. यामध्ये २०१४ मध्ये २९ आॅगस्ट रोजी पहिली बैठक झाली. या पहिल्याच बैठकीला खासदार रविंद्र गायकवाड यांनी दांडी मारली.  यानंतर २९ नोव्हेंबर २०१४ रोजी दुसरी बैठक झाली. बैठकीला ते हजर राहिले. २०१५ या आर्थिक वर्षातही बैठकांची संख्या दोनच्या पुढे सरकली नाही. २२ जून व  ३० डिसेंबर  रोजी झालेल्या दोन्ही बैठकांना त्यांनी हजेरी लावली. यानंतर २०१६ या वर्षात २७ जून, १३ आॅगस्ट आणि २१ डिसेंबर अशा तीन बैठका झाल्या. बैठकांची संख्या एकने वाढली.

परंतु, यापैकी एकाही बैठकीला उपस्थित राहण्याचे तसदी खा. गायकवाड घेतली नाही. २०१७ मध्ये बैठकांची संख्या पुन्हा कमी झाली. या वर्षात केवळ दोनच बैठका घेतल्या गेल्या. ५ जून आणि ५ आॅक्टोबर रोजी या बैठका झाल्या. परंतु, या दोन्हीही बैठकांना त्यांनी दांडी मारली. ५ जूनची बैठक आमदार सुजितसिंह ठाकूर यांना घ्यावी लागली.केंद्र सरकारच्या नीती आयोगाने उस्मानाबादचा समावेश मागास जिल्ह्यांच्या यादीत केला. त्यामुळे २०१८ मध्ये तरी दिशा समितीच्या माध्यमातून जिल्ह्याला विकासाची दिखविण्याचे काम होईल, असे अपेक्षित होते. परंतु, याहीवेळा उस्मानाबादकरांची निराशा झाली. बैठकांची संख्या वाढण्याऐवजी कमी झाली. अख्ख्या आर्थिक वर्षात एकच बैठक (३१ आॅगस्ट) झाली. या बैठकीला खासदार प्रा. गायकवाड यांनी हजेरी लावली. यानंतर जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लोटला. मार्चअखेर तोंडावर येऊन ठेपला आहे. असे असतानाही दिशा समितीची बैठक घेण्यास मुहूर्त मिळालेला नाही, हे विशेष.

टॅग्स :Ravindra Gaikwadरवींद्र गायकवाडOsmanabadउस्मानाबादUsmanabad z pउस्मानाबाद जिल्हा परिषद