याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे इफकोने खतांच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. गतवर्षी १२०० रुपयांमध्ये मिळणारे डी.ए.पी. खत आता १९०० रुपये झाले आहे. तर १०:२६:२६ एका पोत्याची किंमत ११७५ वरून १७७५ रुपये झाली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून, ती मागे घ्यावी. महाबीजची बियाणे कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कोणाकडे किती महाबीजची बियाणे उपलब्ध आहे, याची यादी कृषी विभागाने प्रसिद्ध करावी. तसेच सबसिडीची बियाणे पेरणीपूर्वी वाटप करावे. शासनाने तत्काळ खताची दरवाढ मागे घेऊन खताचा होणारा काळाबाजार थांबवावा, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. यावर जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंके, तालुकाध्यक्ष हरिदास जाधव, सचिव विश्वनाथ स्वामी, किरण कांबळे, हेमंत बनसोडे, विठ्ठल घोगरे, आकाश कांबळे, तुषार वऱ्हाडे, अर्जुन चव्हाण, विजयकुमार अंधारे, जयकुमार घोगरे, मारुती भोसले, शुभम सूर्यवंशी, खंडू घोगरे, आकाश इंडे आदींच्या सह्या आहेत.
दरवाढीविरोधात मनसेने दिला आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:34 IST