युवकांनी उद्योग क्षेत्राकडे वळून स्वावलंबी बनले पाहिजे, असे आवाहन करून या मिल्क प्रॉडक्ट दूध शीतकरण व प्रक्रिया केंद्राचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून, सर्वांनी सहकार्य करून या उद्योगाला दर्जेदार बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी केले.
यावेळी जनविकास सामाजिक संस्थाध्यक्ष शरदचंद्र पवार, कळंब शहरप्रमुख प्रदीप मेटे, माजी सरपंच बाबा मडके, पं. स. सदस्य प्रशांत धोंगडे, म. ग्रा. बँकेचे शाखा व्यवस्थापक अमर झाल्टे, श्रीराम मडके, कृषी विभागाचे मौलाना, संताजी वीर, देवदत्त पाटील, रमेश भिसे (केज), महेश नागटिळक, श्रीकांत शिंदे (नगर), दहिफळ सरपंच चरणेश्वर पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, इस्माईल पठाण, गौर सरपंच श्याम देशमुख, शिंगोली सरपंच दौलतराव माने, बाभळगाव सरपंच आसाराम वाघमारे, महेंद्र कसबे, ग्रामपंचायत सदस्य मारुती देशमुख, आदी उपस्थित होते. (वाणिज्य वार्ता)
180921\fb_img_1631890126334.jpg
जन विकास मिल्क प्रॉडक्ट चे उद्घाटन करताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आमदार कैलास घाडगे-पाटील नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, तालुका प्रमुख शिवाजी आप्पा कापसे,सोमनाथ मडके ,संताजी वीर आदी दिसत आहेत