कसबे तडवळे येथील जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून गावातीलच जिल्हा परिषद कन्या शाळा, केंद्रीय शाळा व उर्दू शाळा या तिन्ही शाळेत कार्यरत असलेल्या ३५ शिक्षकांनी वर्षभर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश पाटील, माजी उपसरपंच शहाजी वाघ, उद्योजक राजाभाऊ लोंढे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील वळेकर, सरपंच मन्मथ आवटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचाही सत्कारही मान्यवरांच्या हस्ते झाला. यात केंद्रीय शाळेतील यशस्वी १८ विद्यार्थी व कन्या शाळेतील १६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. दरम्यान, राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या संस्कृती सत्यवान म्हेत्रे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रत्येक वर्षी शिक्षक व विद्यार्थी यांचा सन्मान करणाऱ्या अंबिका मित्र मंडळ व शाळा व्यवस्थापन समित्यांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रदेश चिटणीस पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक अजय जानराव, कन्या शाळेचे रहेमान सय्यद, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका रहेमा शेख, आदर्श शिक्षक जगन्नाथ धायगुडे, बाळासाहेब जमाले, प्रवीण गाडे, गोविंद देवशटवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश पाटील, प्रभाकर गुळवे, दत्तात्रय कदम, तेजेस भालेराव, सतीश करंजकर, लखन कदम, बाळासाहेब थोडसरे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा प्रियंका गाढवे, महानंदा पाचंगे, रेश्मा गुळवे, ग्रामपंचायत सदस्या अनिता कदम आदी उपस्थित हाेते.
170921\img-20210917-wa0019.jpg
गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार करताना राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश चिटणीस सुरेश पाटील,मा.उपसरपंच शहाजी वाघ, उद्योजक राजाभाऊ लोंढे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल वळेकर, सरपंच मन्मथ आवटे व मान्यवर