‘फ्लाइंग किड्‌स’मध्ये पालक मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:29 AM2021-01-21T04:29:35+5:302021-01-21T04:29:35+5:30

पाणी समस्येबाबत राज्यमंत्र्यांना साकडे उमरगा : तालुक्यातील कलदेव निंबाळा गावाला बऱ्याच दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत असून, दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा ...

Meet the parents at ‘Flying Kids’ | ‘फ्लाइंग किड्‌स’मध्ये पालक मेळावा

‘फ्लाइंग किड्‌स’मध्ये पालक मेळावा

googlenewsNext

पाणी समस्येबाबत राज्यमंत्र्यांना साकडे

उमरगा : तालुक्यातील कलदेव निंबाळा गावाला बऱ्याच दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत असून, दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे ही समस्या त्वरित मार्गी लावावी, अशी विनंती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, तसेच गावच्या सरपंच सुनीता पावशेरे यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना केली. यावर बनसोडे यांनीही येथील पाणीपुरवठा योजनेस प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, ओबीसी सेलचे बाळासाहेब स्वामी, देवीदास पावशेरे उपस्थित होते.

कडकनाथवाडीत ‘कपालेश्वर’चा झेंडा

तेरखेडा : वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी ग्रामपंचायतीत शिवसेना, काँग्रेस व राकाँ पुरस्कृत कपालेश्वर महाआघाडी पॅनल आणि विठ्ठल-रुक्मिणी विकास पॅनल यांच्यात ९ जागांसाठी लढत झाली. यामध्ये कपालेश्वर महाआघाडीचे तय्यम सय्यद, छबूबाई धालगडे, अनिता माने, अभिजित आडसूळ, रुक्मिणी जगताप, शोभा मुळे, शरद मनगिरे, संध्या तोरडमल हे आठ तर विठ्ठल-रुक्मिणी विकास आघाडीच्या आम्रपाली गांधले विजयी झाल्या. यामुळे ही ग्रामपंचायत कपालेश्वर महाविकास आघाडीच्या ताब्यात आली. खामकरवाडी, सटवाईवाडी, नंदगाव, कडकनाथवाडी येथे विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.

कळंब शहरात केली जुगाऱ्यावर कारवाई

कळंब : येथील उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने १८ जानेवारी रोजी छापा टाकून जुगारविरोधी कारवाई केली. शहरातील बसस्थानकाजवळ पथकाने छापा टाकला असता रणजित हारकर (रा. इंदिरानगर) हे कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख दोन हजार रुपयांसह मिळून आले. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातप्रकरणी गुन्हा दाखल

उमरगा : तालुक्यातील जकेकूर येथील कस्तुरबाई व व्यंकट भीमराव दळवे हे दांपत्य ३ जानेवारी रोजी गावातील बसस्थानकाजवळील रस्ता ओलांडत असताना दुचाकीचालक दत्तात्रय कुंभार यांनी त्यांना धडक दिली. यात कस्तुरबाई जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी व्यंकट दळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात १८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकीवरून पडून चिमुकली जखमी

उस्मानाबाद : येथील सरफराज मोहम्मद शरीफ शेख हे १७ जानेवारी रोजी त्यांच्या दुचाकीवरून (क्र.एमएच १२/ सीजी ५०१०) शेजारी राहणाऱ्या प्रीती दत्ता देडे या आठवर्षीय चिमुकलीला घेऊन फरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी जॉनी हॉटेल परिसरात प्रीती दुचाकीवरून खाली पडल्याने जखमी झाली. याप्रकरणी प्रितीची आई मनिषा देडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमरग्यात दोन दुचाकींची धडक

उमरगा : आळंद तालुक्यातील होदलूर येथील गुलाब नबीसाब शेख हे १६ जानेवारी रोजी चौगुले खानावरसमोरील रस्त्यावरून दुचाकीने जात होते. यावेळी दुचाकीच्या (क्र. एमएच २५/ एक्यू ७२७२) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून गुलाब शेख यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात शेख जखमी झाले. याप्रकरणी गुलाब शेख यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जुन्या भांडणावरून एकास मारहाण

उस्मानाबाद : तुळजापूर येथील हुडको भागात राहणारे रवींद्र बळीराम ढवळे हे १० जानेवारी रोजी तुळजाईनगर कॉर्नरच्या पाठीमागे होते. यावेळी विशाल छत्रे, विनोद गंगणे, ज्योतिबा झाडपिडे, प्रशांत कांबळे, गणेश काळे, सादिक शेख, योगेश दळवी, मनोज गवळी यांनी पूर्वीच्या भांडणावरून ढवळे यांना कोयता, लोखंडी गज, दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान ढवळे यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून तुळजापूर ठाण्यात १८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

अपघाताचा धोका

वाशी : शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठ्यासाठी असलेल्या डीपी, फ्यूज बॉक्सचे दरवाजे गायब आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढत असून, याकडे लक्ष देऊन कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे.

दोघांवर गुन्हा

लोहारा : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने लोहारा-हिप्परगा रस्त्यालगत जगदंबा पान स्टॉलवर छापा टाकला. यावेळी मुकेश बाभळे व राजेंद्र फावडे हे कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह मिळून आले. त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.

देशी दारू जप्त

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील नरहरी सुरवसे हे १८ जानेवारी रोजी गावातील एका ढाब्याच्या मागे देशी दारूच्या ४२ बाटल्यांसह पोलिसांना मिळून आले. हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल चोरला

कळंब : वडगाव (मां) येथील सुशील प्रभाकर थोरात हे १८ जानेवारी रोजी येथील आठवडी बाजारात गेले होते. यावेळी अज्ञाताने त्यांचा मोबाइल चोरला. याप्रकरणी थोरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Meet the parents at ‘Flying Kids’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.