शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कामकाजात कसूर; उपजिल्हाधिकाऱ्यावर कार्यवाहीसाठी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा प्रस्ताव

By बाबुराव चव्हाण | Updated: July 11, 2024 19:51 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमका आजार काय, याची तपासणी करून येण्याचे निर्देश दिले आहेत.

धाराशिव : सातत्याने वैद्यकीय रजा घेऊन महत्त्वाची कामे प्रलंबित ठेवणाऱ्या धाराशिवच्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर कार्यवाहीची टांगती तलवार लटकली आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच पुन्हा १२ दिवसांच्या रजेचा केलेला अर्ज फेटाळून जिल्हाधिकाऱ्यांनी नेमका आजार काय, याची तपासणी करून येण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच विभागीय आयुक्तांकडे प्रशासकीय कार्यवाहीचा प्रस्तावही बुधवारी पाठवून दिला.

धाराशिव उपविभागाचे उपजिल्हाधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. निवडणूक विषयक तसेच भूसंपादन, तुळजापूर रेल्वे प्रकल्प, सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त तसेच लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची कामे त्यांच्याकडे आहेत. मात्र, डव्हळे हे सातत्याने वैद्यकीय रजा घेत असल्याने ही कामे प्रलंबित राहिली आहेत. यामुळे जनमानसात प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी त्यांची बारा दिवसांची अर्जित रजा नामंजूर केली आहे. तसेच विभागीय आयुक्तांकडे प्रशासकीय कार्यवाहीसाठी प्रस्तावही पाठवून दिला आहे. यावर आता आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे नजरा लागल्या आहेत.

उपचारासाठी किती दिवस लागतात...डव्हळे यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रातून त्यांना नेमका कोणता आजार झाला आहे, त्यावर उपचारासाठी किती दिवस लागू शकतात, याचा कसलाही बोध होत नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी अधोरेखित केले आहे. त्यामुळे रजा नामंजूर करून डव्हळे यांना सोलापूरच्या स्थायी वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

एकतर्फी पदभार घ्या...डव्हळे यांचा पदभार पुढील आदेशापर्यंत पुनर्वसन उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांना एकतर्फी पदभार स्वीकारून अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

तक्रारींचा रतीब, उत्तरेही देईनात...डव्हळे यांच्याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. रेल्वे भूसंपादनाचा मावेजा तीन महिन्यांपासून प्रलंबित ठेवला. भटके विमुक्त जातीचे प्रमाणपत्र ५ महिने उलटूनही निर्णय घेईनात. मंदिरातील कामांची देयके देण्यास जाणीवपूर्वक विलंब करीत आहेत. केंद्र तसेच राज्य शासनाच्या भूसंपादन विषयक बैठकींना दांडी मारली. त्यांच्याकडील कामे दुसऱ्यांकडे वर्ग करण्याचे पत्र देणे, विधिज्ञांना अपमानास्पद वागणूक देऊन मोबाइल पाहत बसणे, बजावलेल्या नोटिसांना कसलेही उत्तर न देणे, अशी विविध कारणे शिस्तभंगाच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा प्रस्ताव नमूद केल्या आहेत.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादcollectorजिल्हाधिकारी