शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:29 IST

या आगळ्यावेगळ्या पूजेचे हजारो भाविकांनी दर्शन घेऊन ‘आई राजा उदे उदे’चा गजर केला. 

तुळजापूर : आज नवरात्रौत्सवातील आठवी माळेनिमित्त दुर्गाअष्टमीचे औचित्य साधून श्री तुळजाभवानीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडली. या आगळ्यावेगळ्या पूजेचे हजारो भाविकांनी दर्शन घेऊन ‘आई राजा उदे उदे’चा गजर केला. 

तत्पूर्वी रात्री एक वाजता चरणतीर्थ हा नित्योपचार धार्मिक विधी पार पडला. यानंतर भाविकांना तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. पहाटे सहा वाजता नित्योपचार अभिषेक घाट होऊन पंचामृत अभिषेकास प्रारंभ झाला. अभिषेक संपल्यानंतर भोपे पुजारी शशिकांत पाटील यांनी देवीस नैवद्य दाखवून धूपारती व अंगारा हे नियमित विधी पार पडले. त्यानंतर भोपे पुजारी आकाश पाटील यांनी गाभाºयातील घट-कलशाचे पूजन करून त्यास आठवी पुष्पमाळ घालून दर्शन घेतले.

यादरम्यान भोपे पुजारी सचिन परमेश्वर, संजय सोंजी, अतुल मलबा, आकाश पाटील, प्रशांत सोंजी यांनी श्री तुळजाभवानीची महिषासुरमर्दिनी ही विशेष अलंकार महापूजा बांधली. या पूजेत श्री तुळजाभवानी आक्रमक रूपधारण करून हातात त्रिशूळ घेऊन महिषासुराच्या छातीत मारून त्याचा वध केल्याचे दाखविण्यात आले आहे. यावेळी श्री तुळजाभवानीच्या उजव्या बाजूला युद्धातील वाहन सिंह तर देवीच्या पायाखाली महिषासुराचे डोके प्रतिकृती म्हणून दाखविण्यात आलेले आहे. या अशा आगळ्यावेगळ्या शेवटच्या महापूजाचे हजारो देवी भाविकांनी पायी येऊन दर्शन घेतले. यानंतर दुपारी होम यज्ञास अग्नी देऊन हवनासाठी प्रज्वलित करण्यात आले.

अख्यायिकाकुकर नावाचा दैत्य हा देवदेवतांना व मानवांना त्रास  देत होता. यावेळी सर्व देवतांनी देवीपार्वतीला विनवणी केली व यापासून रक्षण करण्याची मागणी केली. यावेळी सर्व देवदेवतांनी पार्वतीस शक्ती देऊन सिंह या वाहनासह तुळजाभवानीचा अवतार घेऊन महिषासूररुपी कुकर दैत्याचा वध केला व महिषासूररुपी मुंडके वेगळे करून पायाखाली चिरडले तसेच त्रिशुळाने छातीवर वार करून त्याचा वध केला. या कुकरदैत्याच्या वधामुळे सर्व देवदेवतांची व मानवांची या महिषासुरापासून सुटका झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादNavratriनवरात्रीspiritualअध्यात्मिक