शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सासू व मुलीचा खून करणा-या महिलेस जन्मठेपे; निकाल ऐकताच आरोपीचा उस्मानाबाद न्यायालयात थयथयाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 18:01 IST

अंगावर रॉकेल ओतून सासूसह मुलीचा खून केल्या प्रकरणात कळंब आगारात वाहक म्हणून काम करणार्‍या महिलेस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दोन हजार रूपये दंडही ठोठावला. शिक्षा ऐकून बाहेर पडताच महिला आरोपीने ‘आपण निर्दोष आहोत’, असे ओरडत न्यायालय आवारात थयथयाट केला.

उस्मानाबाद : अंगावर रॉकेल ओतून सासूसह मुलीचा खून केल्या प्रकरणात कळंब आगारात वाहक म्हणून काम करणार्‍या महिलेस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दोन हजार रूपये दंडही ठोठावला. शिक्षा ऐकून बाहेर पडताच महिला आरोपीने ‘आपण निर्दोष आहोत’, असे ओरडत न्यायालय आवारात थयथयाट केला.

याबाबत सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड़ जयंत देशमुख यांनी दिलेली माहिती अशी की, कळंब शहरातील एका आश्रमशाळेजवळील घरामध्ये कलावती मोहन पांचाळ या २७ मार्च २०१५ रोजी दुपारी त्यांची नात श्रध्दा उर्फ सिध्दी (वय ३) हिला खेळवित बसल्या होत्या़ त्यावेळी घरी आलेली त्यांची सून मिनाक्षी अंकूश पांचाळ हिने ‘तू आमच्याकडे राहू नको’ असे म्हणून भांडण केले़ तसेच एका खोलीतील दोन बाटल्यांमधील रॉकेल आणून कलावती यांच्या अंगावर ओतून काडीने पेटवून दिले.

या घटनेत कलावती पांचाळ व त्यांची नात श्रध्दा या दोघी गंभीररित्या होरपळल्याचा जबाब कलावती यांनी अंबाजोगाई येथील रूग्णालयात उपचारादरम्यान दिला होता. या जबाबावरून मिनाक्षी  यांच्याविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, कलावती व श्रध्दा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ त्यानंतर या प्रकरणात खुनाचे कलम वाढविण्यात आले होते़ या प्रकरणाचा उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे, पोनि सुनिल नेवासे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ए़ए़आऱऔटी यांच्या समोर सुनावणी झाली़ या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व सरकारी अभियोक्ता अ‍ॅड़ जयंत देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश औटी यांनी आरोपी वाहक मिनाक्षी हिस ३० जानेवारी रोजी जन्मठेप व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा ऐकून दालनाबाहेर पडताच आरोपी मिनाक्षी व तिच्या आईनेही न्यायालय आवारात थयथयाट केला़ 

पतीसह आठ साक्षीदार फितूरया प्रकरणात सरकार पक्षाकडून बारा साक्षीदार तपासण्यात आले होते़ आरोपित महिलेच्या पतीसह आठ साक्षीदार फितूर झाले़ शिवाय पंचही फितूर झाले होते़ मात्र, तपासाधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष आणि सरकारी वकील अ‍ॅड़ जयंत जगदाळे यांनी मांंडलेली बाजू यामुळे आरोपी महिलेला न्यायालयाने शिक्षा सुनावली़

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादCourtन्यायालय