उस्मानाबाद -शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलावर पूर्वीप्रमाणे क्रिकेट खेळू द्यावे, अशी मागणी क्रिकेटप्रेमींनी केली आहे. सदरील निवेदन जिल्हा प्रशासनाला बुधवारी देण्यात आले.
उस्मानाबाद शहरात क्रिकेट खेळण्यासाठी पर्यायी मैदान नाही. त्यामुळे शहरातील क्रिकेटप्रेमी जिल्हा क्रीडा संकुलात क्रिकेट खेळण्यासाठी येतात. असे असतानाच जिल्हा क्रीडाधिकारी यांनी २ फेब्रुवारी राेजी संकुलाच्या प्रवेशद्वाराबाहेर नाेटीस डकविली. क्रिकेटप्रेमींना सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंतची वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. इतर वेळेत क्रिकेट खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. हा एकप्रकारे आमच्यासारख्या क्रिकेटप्रेमींवर अन्याय आहे. प्रशासनाच्या या निर्णयाबाबत क्रिकेटप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त हाेत आहे. त्यामुळे प्रशासनाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करून आम्हाला पूर्वीप्रमाणे क्रिकेट खेळण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनास बुधवारी दिले. यावेळी मनसेचे दादा कांबळे यांच्यासह प्रतीक देवळे, विकास पवार, सचिन लाेखंडे, नवनाथ डांगे, दिनेश माने, श्याम जहागिरदार आदी उपस्थित हाेते.