मेघा लाखे, लक्ष्मण लाखे यांची वर्णी
पारगाव : वाशी तालुक्यातील लाखनगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. यात सरपंचपदी मेघा संतोष लाखे व उपसरपंचपदी लक्ष्मण माणिकराव लाखे यांची बिनविरोध निवड झाली.
रोजगारानिमित्त बाहेरगावी असलेले लक्ष्मण लाखे हे कोरोना काळात गावी आले होते. यानंतर त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षाविना स्वतंत्र पॅनेल उभे करून सात उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे, ते स्वत: दोन जागेवर विजयी झाले. यामुळे ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आली. बुधवारी त्यांच्या पॅनेलच्या मेघा लाखे व लक्ष्मण लाखे यांची सरपंच, उपसरपंच पदी निवड झाली.
यावेळी मनोज ढेपे, अश्विनी गिरी, सुरेखा तवले, ताई सुरवसे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून जी. बी. भोकरे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी एस. एस. शेलार यांनी सहकार्य केले. यावेळी बन्सी लाखे, बाबासाहेब लाखे, सुभाष मोरे, संतोष लाखे, शिवाजी गिरी, प्रभाकर माने, दत्ता लाखे, पुरुषोत्तम तवले, दिनकर तवले, गणेश ढेपे, आबासाहेब लाखे, दिलीप पाटील, रमेश पाटील, प्रवीण लाखे, भारत लाखे, अरुण माने, दत्तप्रसाद गिरी, मनोज लाखे, रामहरी ढेपे, उत्तम वाघमारे, भानुदास लाखे, आदी उपस्थित होते.