शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कुर्डूवाडी-लातूर रेल्वेगाडी ११० किमी वेगाने धावणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 16:58 IST

ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यास मदत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे (मुंबई) महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी दिली. 

ठळक मुद्देमहाप्रबंधक शर्मा यांची माहिती उस्मानाबाद स्थानकाची केली तपासणी

उस्मानाबाद : तासी ९० किमी वेगाने धावणारी कुर्डूवाडी-लातूर ही रेल्वेगाडी डिसेंबरमध्ये तासी ११० किमी वेगाने धावेल. ज्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यास मदत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे (मुंबई) महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी दिली. 

रेल्वेचे महाप्रबंधक शर्मा यांनी शुक्रवारी उस्मानाबाद रेल्वेस्थानकाची तपासणी केली. विशेष रेल्वेतून सर्व विभाग प्रमुखांच्या ताफ्यासह ते दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास उस्मानाबाद स्थानकात दाखल झाले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसह प्लॅटफार्म, पाण्याची सुविधा, स्वच्छता, प्रवाश्यांच्या विश्रांती कक्षात जावून सोयीसुविधांची पाहणी केली. त्यानंतर स्थानक परिसरालाही भेट दिली. स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेला असलेल्या खुल्या भूखंडावर वृक्षारोपण करण्याची सूचना त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना केली. यानंतर शर्मा यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

कुर्डूवाडी-उस्मानाद-लातूर या मार्गावर गाड्या वाढविण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला असता, दीड वर्षात विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर आपण आवश्यक तेवढ्या गाड्यांची संख्या वाढू शकतो. कुर्डूवाडी-लातूर या रेल्वेगाडीचा वेगही वाढविण्यात येणार आहे. सध्या ही रेल्वेगाडी तासी ९० किमी वेगाने धावते आहे. डिसेंबरमध्ये ही रेल्वेगाडी तासी ११० किमी वेगाने धावेल, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे प्रवाशांचा प्रवास पूर्वीच्या तुलनेत अधिक वेगावान होऊन वेळेचीही बचत होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी रेल्वे उपभोक्ता समितीचे सदस्य संजय मंत्री यांच्यासह प्रवाश्यांनीही महाप्रबंधक शर्मा यांच्यापुढे काही गरजा मांडल्या. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

रेल्वेस्थानक चकाचक...सोलापूर विभागाचे रेल्वे प्रबंधक हितेंद्र मल्होत्रा यांनी २५ आॅक्टोबर रोजी स्थानकाला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी त्यांनी स्वच्छतेसह विविध असुविधांवरून अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. शुक्रवारी महाप्रबंधक शर्मा रेल्वेस्थानकाच्या तपासणीसाठी आले असता, स्थानक चकाचक केले होते. पाणी, स्वच्छता, पार्र्किं ग आदी बाबींची दक्षता घेतल्याचे पहावयास मिळाले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादrailwayरेल्वेpassengerप्रवासी