उमरगा : तालुक्यातील औराद (गुं.) येथे पंचायत समिती सदस्या क्रांतीताई किशोर व्हटकर यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या कोविड लसीकरण केंद्राचे शिवसेना युवानेते किरण गायकवाड यांच्या हस्ते गुरुवार, २२ रोजी उद्घाटन करण्यात आले. यावेळी ११२ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले.
औराद (गुं) हे गुंजोटी पंचायत समिती गणात येत असून, पंचायत समिती सदस्या क्रांतीताई व्हटकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर येथे लसीकरण केंद्र मजूर झाले. या केंद्राचे उद्घाटन २२ एप्रिल राेजी शिवसेना युवानेते किरण गायकवाड, योगेश पाटील, औराद उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास भोसले, समर्पण सामाजिक सेवाभावी संस्थेचे किशोर व्हटकर, ग्रामसेवक गणेश माळी, उमरगा बाजार समितीचे संचालक तानाजी भिसे, आरोग्यसेवक अमोल पाटील, आरोग्य पर्यवेक्षिका शिंदे, आरोग्यसेविका उर्मिला पाटील, श्रीमती भालेराव, शिवसेना शाखाप्रमुख नागेश गायकवाड, ग्रामपंचायत लिपीक मारूती गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, प्रसाद गायकवाड, पवन गायकवाड, विनोद पाटील, वैभव शिंदे, प्रवीण जाधव, संभाजी सूर्यवंशी, माधव रणखांब, शिवाजी सोमवंशी, अनिल जगताप, बाळू शिंदे, कुंदनलाल सूर्यवंशी, बाबुराव पाटील, राजेंद्र पाटील, बाळू चौधरी, गोविंद कारभारी, बालाजी पाटील यांची उपस्थिती होती. लसीकरण यशस्वी करण्यासाठी आशा कार्यकर्ती सोनाली गायकवाड, रमाबाई गायकवाड, मदतनीस भामाबाई दुधभाते आदींनी परिश्रम घेतले.