शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता लागताच बस, पेट्रोल पंपावरील जाहिराती हद्दपार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 19:51 IST

राजकीय बॅनर्स पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हटविणे अपेक्षित आहे. असे असतानाही यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला जुंपावली लागली.

ठळक मुद्देसीओंच्या निर्देशानंतर कार्यवाही नगर पालिकेने राबविली मोहीम

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील पालिकेच्या जागेवर तसेच मालकीच्या जाहिरात फलकावर असलेले राजकीय बॅनर्स, पोस्टर तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी दिवसभर तसेच सायंकाळी उशिरापर्यंत ही मोहीम राबवून जवळपास ६५ बॅनर हटविले.

उस्मानाबाद शहरामध्ये जेथे-जेथे राजकीय व्यक्तींची नावे असलेली फलके आहेत, ते तातडीने काढण्याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार सोमवारी दिवसभर सर्वच झोन क्षेत्रात स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आली. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यवाहीतून सुमारे ६५ बॅनर हटविण्यात आले आहेत. वास्तविक सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग, वा बॅनर ज्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे असेल, त्यांनी वा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हटविणे अपेक्षित आहे. असे असतानाही यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला जुंपावली लागली. त्यामुळे यावर होणारा खर्च कोण देणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होवू लागला आहे.

बसेसवरील जाहिरातीही हद्दपारकेंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने जनतेसाठी हाती घेतलेल्या योजनांची माहिती एसटी बसेसच्या माध्यमातून गावोगावी पोहोचविल्या जातात. प्रवाशांच्या सहज नजरेस पडतील, असे फलकही स्थानक परिसरात लावलेले असतात. आचारसंहिता लागू होताच महामंडळाने बसेसवरील जाहिरीराती हटविण्यासोबतच योजनांची माहिती देणारे फलकही काढून घेतले आहेत. 

पेट्रोल पंपावरील बॅनर उतरविलेकेंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘उज्ज्वला’ सारख्या योजनांची माहिती देणारे फलक पेट्रोल पंपावर लावण्यात आले होते. नगर पालिकेच्या पथकाकडून हेही फलक सोमवारीच हटविण्यात आले आहेत. दरम्यान, ग्रामीण भागात अनेक पेट्रोल पंपांवर हे फलक पहावयास मिळाले.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाOsmanabadउस्मानाबाद