शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फळभाज्यांची आवक वाढली; पत्ता कोबी, फ्लाॅवर, टोमॅटो कवडीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST

मान्सूनमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने यंदा प्रकल्पांत पाणीसाठा वाढला आहे. मुबलक पाणीसाठा असल्याने अनेक शेतकरी फळभाज्या व पालेभाज्यांच्या ...

मान्सूनमध्ये वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने यंदा प्रकल्पांत पाणीसाठा वाढला आहे. मुबलक पाणीसाठा असल्याने अनेक शेतकरी फळभाज्या व पालेभाज्यांच्या लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळे बाजारात मागील अडीच महिन्यांपासून पालेभाज्यांची आवक वाढली आहे. परिणामी, भाज्यांचे दर दिवसेंदिवस घसरत आहेत. पत्ताकोबी, फ्लाॅवर, टोमॅटोचे दर उतरले आहेत. टोमॅटो पाच, पत्ता कोबी १०, फ्लाॅवर १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. बटाटा २०, कारले, दोडका, वांगी, भेंडी ४० रुपये, गवार ५० रुपये दराने विक्री होत आहेत. शिमला मिरची ३०, हिरवी मिरची ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली; तर शेवग्याचा तुटवडा कायम असल्याने शेवगा ८० रुपये प्रतिकिलो दरानेच विक्री हाेत आहे. पालेभाज्यांत पालक पाच रुपये जुडी, मेथी, शेपू, चुका १० रुपये जुडीप्रमाणे विक्री झाली.

डाळीचे भाव आवाक्यात

दोन महिन्यांपूर्वी डाळींचे दर वाढले होते. सध्या डाळींच्या दर कमी झाले आहेत. हरभराडाळ ५५, तूर ८८, उडीद ९०, मूग ९०, मसूर ६५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. खाद्यतेलाचे दर पाच टक्क्यांनी उतरले आहेत. सोयाबीन तेल १२०, पामतेल ११५, मोहरी तेल १३०, शेंगदाणा तेल १३० रुपये किलोने विक्रीस आहे.

संत्र्याला मागणी

सफरचंद १०० ते १४० रुपये, चिक्कू ४० ते ५० रुपये, डाळींब १२० ते १६० रुपये, संत्रा ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. केळी ३० रुपये डझनप्रमाणे विक्री होत आहे.

मेथी १० रुपये जुडी

मागील १५ दिवसांपूर्वी मेथी १० रुपयांस तीन जुडी विक्री होत होत्या. सध्या मेथीचे दर काही अंशी वाढले असून, १० रुपयांना एक जुडी विक्री होत आहे. कोबी पाच रुपये जुडी, पालक १० रुपये, शेपू, चुका १० रुपये जुडीप्रमाणे विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

कोट

बाजारात शेवग्याचा तुटवडा असल्याने शेवगा महाग आहे. मात्र, इतर भाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आहेत. त्यामुळे भाज्यांची खरेदी मनसोक्त केली जात आहे.

सुनील कांबळे, ग्राहक

मागील तीन दिवसांत तेलाचे दर पाच टक्क्यांनी घटले आहेत. येत्या १५ दिवसांत खाद्यतेलाचे दर आणखी उतरण्याची शक्यता आहे. शिवाय, डाळींचे दरही स्थिर आहेत.

अमित भराटे

किराणा व्यावसायिक

एक एकर क्षेत्रावर काकडीची लागवड केली आहे. लागवडीसाठी पाच हजार रुपये खर्च झाला. तो निघाला आहे. आणखी पाच हजार रुपये मिळू शकतात.

- विलास झांजे,

भाजीपाला उत्पादक