हिंदू साम्राज्य दिनानिमित्त विविध उपक्रम
उमरगा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व जनसेवा मंडळ उमरगा यांच्या वतीने हिंदू साम्राज्य दिनानिमित्त येथे रक्तदान शिबिर तसेच रुग्ण उपयोगी साहित्य केंद्राची सुरुवात बुधवारी श्री दत्त मंदिर सभागृहात करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचे महाराष्ट्र प्रदेश सहकार्यवाह अरुण डंके, विभाग कार्यवाह नरेंद्र पाठक, जनकल्याण विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश रायचूरकर,
जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह ॲड. कृष्णा मसलेकर, भाजपाचे संताजी चालुक्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह प्रमोद बाकलीकर,तालुका संघचालक प्रा. राजाराम निगडे, डॉ. चंद्रकांत महाजन, मुरलीधर मुगळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लातूरच्या संवेदना प्रकल्पाचे रत्नदीप बोटवे, भारत माता प्रकल्पाचे शंकर जाधव, गोपाळ आष्टे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह रामदास कुलकर्णी, महेश पाटील, श्रीराम पुजारी बालाजी मद्रे, आनंद जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक संघचालक प्रा. राजाराम निगडे यांनी केले. सूत्रसंचालन रामदास कुलकर्णी यांनी केले तर आभार जनकल्याण समितीचे जिल्हा सहकार्यवाह गिरीष पाटील यांनी मानले. कार्यक्रमास बालाजी मद्रे, शहाजी जाधव, अविनाश आभंगराव, रणजित विभूते, प्रकाश विभूते, काशिनाथ राठोड, ओमप्रकाश मुगळे आदी उपस्थित होते.