शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मी ऊस जाळला नाही; घ्या हनुमानाची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 06:39 IST

एकीकडे गुन्हेगार, आरोपी शोधण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतानाच अजूनही काही ठिकाणी अंधश्रद्धा जोपासत कल्पनेपलीकडील उठाठेवी केल्या जातात.

अणदूर (जि. उस्मानाबाद) : एकीकडे गुन्हेगार, आरोपी शोधण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतानाच अजूनही काही ठिकाणी अंधश्रद्धा जोपासत कल्पनेपलीकडील उठाठेवी केल्या जातात. हिप्परगा ताड गावातील ग्रामस्थाचा ऊस अज्ञाताने जाळला आहे. त्याचा आरोपी शोधण्यासाठी गावातील काही लोकांनी हनुमानाची शपथ घेऊन पायरी बडविण्याची उठाठेव केली.तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा (ताड) येथील शेतकरी बसवेश्वर गुरुनाथ बचाटे यांचा दोन एकर ऊस अज्ञाताने दहा दिवसांपूर्वी जाळला गेला होता. त्यातून त्यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. याबद्दलची तक्रार इटकळ आऊटपोस्टला केली गेली आहे. मात्र, अद्याप आरोपीचा सुगावा लागलेला नाही. यावरून अनेकांकडे संशयाने पाहिले जात होते. ही ब्याद संपुष्टात आणण्यासाठी गावातील काही लोकांनी एकत्र येत एक समिती स्थापन केली. या समितीने गावातील नागरिकांनी ग्रामदैवत हनुमानाची शपथ घेऊन मंदिराची पायरी बडवावी, असा निर्णय घेतला. अर्थात जो शपथ घेणार नाही, तो संशयित असेल, असा निष्कर्ष काढून त्यांची नावे पोलिसांना कळविण्यात येणार असल्याचीही चर्चा उठली. त्यामुळे शनिवारी गावातील दीडशेवर नागरिकांनी ‘आम्ही ऊस पेटवला नाही’ असे म्हणून हनुमानाची शपथ घेतली व मंदिराची पायरी बडवत यातून सुटका करून घेतली.  या प्रकारातून महिला, बालके व वृद्धांना वगळण्यात आले होते. सकाळपासून मंदिरासमोर पायरी बडविण्यासाठी गर्दी झालेली होती. एकूणच या प्रकाराने आरोपीचा सुगावा लागला नसला तरी गावातील काही लोकांची ही तपासकामाची पद्धत चर्चेचा विषय ठरली आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबाद