वाशी : घरगुती वापराच्या गॅस टाकीच्या पाईपमधून गॅसची गळती झाल्यामुळे लागलेल्या आगीत रोख १ लाख ४० हजार व शेतीची कागदपत्रे, संसारोपयोगी साहित्य जळाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भूम तालुक्यातील रामकुंड येथे घडली.की, रामकुंड येथील श्रीराम काशीनाथ हाके यांचे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी घर आहे. बुधवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांची सून स्वप्ना इंद्रजीत हाके यांनी स्वयंपाक घरात जाऊन गॅस पेटवला असता अचानक भडका उडून आग लागली. यात घरातील फ्रिज, कुलर, कपडे, धान्य व पेटीेत ठेवलेले १ लाख ४० हजार रूपये जळून खाक झाले. याशिवाय सोन्याचे दगिनेही वितळून नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सर्जेराव महानोर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. दरम्यानच्या कालावधीत त्यांनी भूम येथील अग्निशामक दलाच्या गाडीसही तेथे पाचारण केले. अग्निशामक दल व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून ही आग विझविण्यात आली. यावेळी आगीत गॅसच्या टाकीचा स्फोट होईल, अशी भिती सर्वांच्याच मनात होती. या घटनेची वाशी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
गॅस गळतीमुळे घराला आग
By admin | Updated: November 17, 2016 00:46 IST