शहरातील भीमनगर येथील रहिवासी सागर बाबासाहेब जानराव यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमातून एमडी ही परीक्षा उत्तीर्ण केली तर श्वेता (अंतरा) सुनील बनसोडे हिने एलएलएम परीक्षेत यश संपादन केले. याबद्दल या दोघांचाही भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे व जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष विजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाच्या औचित्याने सामूहिक पंचशील घेऊन भैय्यासाहेब आंबेडकर, पेरियार रामस्वामी नायकर यांनाही अभिवादन करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सुमधुर संगमाने उपस्थितांना पेढे वाटप केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव, विद्यानंद वाघमारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ॲड. जीनत प्रधान, विजय बांगर, अनुराधा लोखंडे, सुजाता बनसोडे, रुक्मीनबाई बनसोडे, नंदाताई माने, सुनीता बनसोडे, सृष्टी बनसोडे यांच्यासह जागृती फाउंडेशनचे आदिनाथ सरवदे, आप्पासाहेब जानराव, उमाजी गायकवाड, बाबासाहेब कांबळे, कैलास शिंदे, अतुल लष्करे, किरण कांबळे, सुनील माळाळे, प्रशांत ओव्हाळ, प्रशांत शिंदे, प्रशांत सोनवणे, कुंदन चिलवंत, संतोष माने, रणजित कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.क