उस्मानाबाद -तालुक्यातील तुगाव येथील घर फाेडून अज्ञात चाेरट्यांनी साेन्या-चांदीच्या दागिन्यांसह राेकड लंपास केली. या प्रकरणी ढाेकी पाेलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने भुजंग गणपती शेंडगे हे २२ मेच्या रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवून झाेपले हाेते. हीच संधी साधत अज्ञाताने घरामध्ये प्रवेश करून ३ ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने, दाेन स्मार्टफाेन व राेख ३ हजार रुपये लंपास केले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी चाेरीची ही घटना उघडकीस आली. त्यानंतर शेंडगे यांनी ढाेकी पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात चाेरट्यांविरुद्ध भादंसंचे कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस करत आहेत.
चाैकट...
खडकी शिवारातून पाणबुडी पळविली
तुळजापूर तालुक्यातील खडकी शिवारात सीताराम मानसावले यांची विहीर आहे. या विहिरीतील पाणबुडी माेटार अज्ञाताने लंपास केली. ही घटना १९ ते २१ मे या कालावधीत घडली. चाेरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर मानसावले यांनी तामलवाडी पाेलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून २२ मे राेजी अज्ञाताविरुद्ध भादंसंचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास तामलवाडी पाेलीस करत आहेत.