शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

लोकसभेसाठी अर्ज भरण्यास इच्छुकांना सुट्या, करीदिनाची आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 14:34 IST

या आठवड्यात तरी अर्ज भरण्यासाठी सण, सुट्यांचा अडसर असणार आहे़

ठळक मुद्दे२१ तारखेला धुलिवंदनाची शासकीय सुटी असल्याने अर्ज स्विकृती होणार नाही़सोमवार व मंगळवारी अर्ज भरण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी होऊ शकते,

- चेतन धनुरे 

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीची लगीनघाई आता प्रत्यक्षात सुरु झाली आहे़ दुसऱ्या टप्प्यातील उस्मानाबाद मतदारसंघाची अधिसूचना १९ मार्चला जारी होत आहे़ दरम्यान, सुट्या व चांगल्या-वाईट दिवस गोळाबेरीज केल्यास इच्छुकांची पंचाईतच होत आहे़ 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना १९ मार्च रोजी जाहीर होत आहे़ या दिवसापासूनच नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्विकृती होणार आहे़ अर्ज स्विकृतीची अंतिम तारीख २६ मार्च आहे़ छाननी २७ रोजी होणार असून, अर्ज माघारीची मुदत २९ मार्चपर्यंत आहे़ दरम्यान, १९ मार्चचा पहिला दिवस हा नामनिर्देशनपत्र घेण्यातच जाणार आहे़ त्यानंतर २० तारखेला होळीचा सण आहे़ पारंपारिक विचारधारेनुसार या सणाला बोंबल्याचा महिना म्हणतात़ त्यामुळे यादिवशी अर्ज भरण्याच्या शक्यता कमीच आहेत. 

२१ तारखेला धुलिवंदनाची शासकीय सुटी असल्याने अर्ज स्विकृती होणार नाही़ २२ तारखेला करीदिन आहे़ साधारणत: हा दिवसही आपल्याकडे अशुभ मानला जातो़ २३ ला चौथा शनिवार तर २४ तारखेला रविवारची सुटी आहे़ त्यामुळे या आठवड्यात तरी अर्ज भरण्यासाठी सण, सुट्यांचा अडसर असणार आहे़ परिणामी, सोमवार व शेवटचा दिवस असलेल्या मंगळवारी अर्ज भरण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी होऊ शकते, अशी चिन्हे आहेत़ दरम्यान, असे असले तरी जे इच्छुक शुभ-अशुभ मानत नाहीत, त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभच म्हणायला हरकत नाही़

करीचा दिवसही चांगला : पंचांग अभ्यासकहोळी व करीचा दिवसही तसा पाहिला तर चांगलाच असतो़ मात्र, आपल्याकडे प्रचलित विचारधारेमुळे लोक शुभकार्याच्या बाबतीत या दिवसांचा विचार करीत नाहीत़ कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यासाठी खरेतर शुक्रवार चांगला दिवस असतो़ करीदिन असला तरी़ सोमवार व मंगळवार हे सर्वसाधारण दिवस आहेत़ ते अडचणीचे नक्कीच नाहीत़ तरीही संबंधित इच्छुकांच्या कुंडलीनुसारच त्यांच्यासाठी कोणता दिवस शुभ-अशुभ हे सांगणे उचित राहील़-नागेश आंबुलगे, पंचांग अभ्यासक, तुळजापूर

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ElectionनिवडणूकOsmanabadउस्मानाबाद