शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

गावकरी सोडाच, महाराष्ट्रातील 'या' उमेदवाराला त्याचे आई-वडीलही देणार नाहीत मत, कारण...

By महेश गलांडे | Updated: April 17, 2019 14:47 IST

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान घेण्यात  येत आहे.

उस्मानाबाद - लोकसभा उस्मानाबाद मतदारसंघातील आणि बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावात असलेल्या असुविधांबद्दल उमेदवार आणि स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी दर्शवत अख्ख गावचं मतदानावर बहिष्कार टाकत आहे. विशेष म्हणजे या गावातील तरुण मुलगा आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड हे उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार असून त्यांनाही मतदानावर बहिष्कार टाकण्याची विनंती गावकऱ्यांनी केली आहे.   

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान घेण्यात  येत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील हे उमेदवार आहेत. तर, शिवसेनेकडून माजी आमदार ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघाला लोकसभा निवडणुकांसाठी उस्मानाबाद या मतदारसंघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील हक्काचा उमेदवार म्हणून तालुक्यातील वाणेवाडी गावचे पुत्र शंकर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रस्थापितांविरुद्ध लढण्यासाठी शेतकरी नेता असलेल्या शंकर गायकवाड यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता उमेदवारी कायम ठेवली. मात्र, येथील गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शंकर गायकवाड यांना गावातील एकही मत मिळणार नाही. विशेष म्हणजे शंकर यांच्या आई-वडिलांचेही मतदान शंकर यांना पडणार नाही. कारण, या गावातील सर्वच गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावातील समस्या सोडविण्यात स्थानिक नेते अपयशी ठरल्याचे सांगत गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. 

उस्मानाबाद मतदारसंघातील आणि बार्शी तालुक्यातील वाणेवाडी हे गाव सध्या चर्चेत आहे. या गावातील ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय एकमताने घेतला असून सर्वच गावकरी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. साधारणत: 1200 ते 1300 लोकसंख्या आणि 800 मतदान असलेल्या या गावात अनेक स्थानिक नेत्यांनी संपर्क केला. मात्र, अद्याप गावकरी मानायला तयार नाहीत. ग्रामस्थांनी चक्क गावाच्या बाहेर एक डीजिटल फलक झळकावला आहे. त्यामध्ये वाणेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार असे लिहिले आहे. तसेच, गावकऱ्यांकडून पत्रेकही छापण्यात आली आहेत. त्या पत्रकारवरही ''अभी नही तो कभी नही'' असा संदेश लिहून गावातील  समस्यांची यादीच देण्यात आली आहे. 

गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची वैशिष्टे गावात येण्या-जाण्यासाठी रस्ता नाही.पाण्याची कसलिही सोय नाही.देश स्वतंत्र झाल्यापासून बससेवा नाही.जिल्हा परिषद शाळा पडझडीस आली आहे, तर शाळेकडे कुठल्याही अधिकाऱ्यांचे लक्ष नसते. अनेक गोर-गरीब ग्रामस्थांना रेशनकार्ड नाही. शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. सरकारी अधिकाऱ्यांचे गावाकडं दुर्लक्षअसे मुद्दे गावकऱ्यांनी छापलेल्या पत्रकात लिहिलेली आहेत.

उमेदवार शंकर गायकवाड 

उस्मानाबद लोकसभा मतदारसंघात एकूण 13 उमेदवांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये प्रमुख लढत ही महाआघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेचे नेते राणा जगजितसिंह तर  शिवसेनेचे नेते महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यात होत आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार उभा केला आहे. तर, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, चळवळीतून उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकरी नेता म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या शंकर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. शंकर गायकवाड यांनी अनेक आंदोलनातून शेतकरी वर्गाला न्याय मिळवून दिला आहे. तर, स्थानिक प्रश्नांसाठी आंदोलन करुन जनतेचे प्रश्नही अनेकदा मार्गी लावले आहेत. मात्र, अद्यापही गावातील प्रश्न अनुत्तरीतच आहेत. त्यामुळे यंदा गावकऱ्यांनी जी भूमिका घेतली त्यास आपलाही पाठिंबा असल्याचे शंकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.   

गावकऱ्यांच्या भूमिकेला माझाही पाठिंबा आहे, पण मी उमेदवार असल्याने मतदान करणे बंधनकारक आहे. मी मतदान न केल्यास कायदेशीर भंग होईल, असे तहसिलदार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मी मतदानाचा हक्क बजावणार आहे. मात्र, माझ्या कुटुंबातील सदस्य, माझे आई-वडिल आणि बायकोचेही मला मतदान मिळणार नसल्याचे शंकर यांनी म्हटले. तसेच, मला मिळणाऱ्या मतदानापेक्षा माझ्या गावकरांचे प्रश्न सुटणे गरजेचं असल्याचंही शंकर गायकवाड यांनी सांगितलं.  

टॅग्स :osmanabad-pcउस्मानाबादLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019Votingमतदान