शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जायचं होतं पंढरपूरला हेलिकॉप्टर उतरवलं तुळजापुरात; विनापरवानगी ‘लँडिंग’मुळे कंपनीला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:22 IST

विनापरवाना हेलिकॉप्टर लँड केल्याने कंपनीला दहा हजार रुपयांचा दंड

तुळजापूर (जि. धाराशिव) : पंढरपूर समजून पायलटने तुळजापुरमध्यचे एक हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. ही घटना ३० जुलै रोजी घडली. येथील हेलिपॅडवर विनापरवाना हेलिकॉप्टर उतरविल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित हेलिकॉप्टर कंपनीला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. अखेर दंड भरल्यानंतर सायंकाळी सव्वापाच वाजता हेलिकॉप्टरने येथून उड्डाण भरले.

हैदराबाद येथून पंढरपूरकडे निघालेले मुंबईच्या हेलिगो चार्टर्ड कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी दीड वाजता तुळजापूर येथे पोहोचले. तुळजाभवानी मंदिरावर घिरट्या घातल्यानंतर त्याने नळदुर्ग रोडवर असलेल्या बांधकाम विभागाच्या हेलिपॅडवर विसावा घेतला. दरम्यान, हेलिकॉप्टर उतरण्याची कोणतीही सूचना बांधकाम, महसूल, पोलिस प्रशासनाला नव्हती. त्यामुळे या तिन्ही यंत्रणांची एकच धावपळ उडाली. तुळजापूरचे सहायक पोलिस निरीक्षक विजय पवार, कर्मचारी माने यांनी हेलिपॅडवर पडताळणी केली. यावेळी हेलिकॉप्टरच्या कॅप्टनने पंढरपूर येथील परवानगी दाखविली. हे तुळजापूर असल्याचे सांगितल्यानंतर त्याने समन्वयकाकडून येथील लोकेशन मिळाल्याचे सांगितले. तोपर्यंत पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय आवळे हेलिपॅडवर दाखल झाले. विनापरवाना हेलिकॉप्टर लँड केल्याने कंपनीला दहा हजार रुपयांचा दंड केला. तो भरून घेतल्यानंतर सव्वापाच वाजता हेलिकॉप्टरने येथून उड्डाण भरले.

हा प्रकार गंभीरतुळजापूर हे तीर्थक्षेत्राचे क्षेत्र आहे. येथे भाविकांची कायम वर्दळ असते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बुधवारचा हा प्रकार गंभीर होता. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना हा प्रकार कळविला आहे.- आण्णासाहेब मांजरे, पोलिस निरीक्षक, तुळजापूर

 विनापरवानगी लँडिंग संशोधनाच्या कामासाठी हैदराबाद येथून पंढरपूरकडे निघालेले हेलिकॉप्टर त्यांच्यातील समन्वयाअभावी तुळजापुरात उतरवण्यात आले होते. संपूर्ण प्रकाराची खात्री केल्यानंतर विनापरवानगी लँडिंग केल्याने कंपनीस दहा हजार रुपये दंड केला.-विजय आवाळे, उपकार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग.

टॅग्स :Pandharpurपंढरपूरdharashivधाराशिव