शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
4
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
5
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
6
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
8
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
9
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
10
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
11
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
12
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
13
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
14
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
15
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
16
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
17
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
18
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
19
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
20
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप

कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार, वाशीरा नदीला पूर; शेकडो एकर पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:29 IST

रस्ते बंद; शेती जलमय, जनजीवन विस्कळीत

बालाजी अडसूळ, कळंब (जि. धाराशिव) : कळंब तालुक्यात शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे वाशीरा नदीला प्रचंड पूर आला आहे. या पुरामुळे इटकूर, आथर्डी, आडसुळवाडी, बोरगाव ध आदी गावांमधील शेती आणि जनजीवनाचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की, १०० फूट रुंदीचे पात्र सोडून पाणी अर्धा ते पाऊण किलोमीटरपर्यंत पसरले आहे. यामुळे शेकडो एकर शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे.

ढगफुटीसदृश्य पाऊसबालाघाटाच्या डोंगररांगांमध्ये उगम पावणाऱ्या मांजरा नदीची उपनदी असलेल्या वाशीरा नदीच्या खोऱ्यात गुरुवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला होता. मध्यरात्रीच्या सुमारास बोरगाव धनेश्वरी, इटकूर, गंभिरवाडी या शिवारात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला, ज्यामुळे नदीला अचानक पूर आला.

शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान: पुराच्या पाण्याने सोयाबीन, ऊस यांसारखी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. आडसुळवाडी, इटकूर, आथर्डी येथील असंख्य शेतकऱ्यांचे हेक्टरो पिक पूर्णपणे पाण्यात बुडाले आहेत. इटकूर येथील मधुकर आडसुळ यांच्या शेतातील घर आणि संसार पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच, अनेक शेतकऱ्यांचे गोठेही पाण्याने वेढले आहेत.

वाहतूक ठप्प: पुराच्या पाण्यामुळे परिसरातील वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे. कळंब-पारा-वाशी आणि कळंब-लातूर-भाटसांगवी हे दोन्ही महत्त्वाचे राज्यमार्ग इटकूर आणि आथर्डी येथील पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे बंद करण्यात आले आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊस