चार दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवात धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र, पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार चारपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास बंदी असल्याने यात्रा रद्द करण्यात आली. यात्रेतील धार्मिक कार्यक्रम अगदी मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. यानिमित्त मंगळवारी सांयकाळी संदल शरीफ (मिरवणूक) दर्गाहमध्येच काढण्यात येणार आहे. बुधवारी जियारत कार्यक्रमदेखील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. कुस्त्याची दंगल आणि कव्वालीचा कार्यक्रमही होणार नाही. कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने महसूल व पोलीस प्रशासनाच्या सक्त सूचनेमुळे यात्रा उत्सव रद्द करण्यात आला असून, भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनीही यात्रेत साहित्य आणू नये, असे आवाहन हजरत सय्यद बाशा ऊरूस समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
हजरत सय्यद बाशा यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST