शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:38 IST

(फोटो : दत्ता नांगरे १६) उमरगा : येथील कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये इंग्रजी विभागप्रमुख राजकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जयंतीचा ...

(फोटो : दत्ता नांगरे १६)

उमरगा : येथील कै. शरणप्पा मलंग विद्यालयामध्ये इंग्रजी विभागप्रमुख राजकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जयंतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमास कुमारस्वामी प्राथमिक विद्या मंदिराचे सहशिक्षक विरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन अगतराव मुळे यांनी केले तर या आभार परमेश्वर कोळी यांनी मानले.

भाऊसाहेब नगरात अभिवादन

(फोटो : दत्ता नांगरे १६)

बलसूर : येथील भाऊसाहेब नगरमध्ये श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बब्रुवान चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, गुलाबदास चव्हाण, रमेश राठोड, वामन राठोड, मोहन चव्हाण, रोहिदास चव्हाण, प्रवीण पवार, किसन चव्हाण, सागर जाधव, शरद पवार, राजेंद्र चव्हाण, शंकर पवार, माधव चव्हाण, मोहन पवार, राजेंद्र राठोड, बाळू पवार, अनिल राठोड, सुधाकर राठोड, बाबू जाधव, लताबाई चव्हाण, मोताबाई राठोड, झमकाबाई चव्हाण, संजना राठोड आदी उपस्थित होते.

श्रीकृष्ण महाविद्यालयात विविध कार्यक्रम

(फोटो : सिद्राम देशमुख १६)

गुंजोटी : येथील श्रीकृष्ण महाविद्यालयात प्रा. डॉ. भाऊसाहेब उगले यांच्या हस्ते सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. गुलाब राठोड यांनी विद्यार्थ्यांना संत सेवालाल यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी प्रा. डॉ. किसन लोहार, प्रा. डॉ. बालाजी कोनाळे, प्रा. डॉ. महादेव खोत, प्रा. प्रमोद चौधरी, प्रा. डॉ. विलास होगाडे, ग्रंथपाल डॉ. अनिल काळदाते, प्रा. डॉ. एम. जी. अंबुसे, भारतबाई चव्हाण, मोती जेटीथोर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

नळदुर्गमध्ये झेंडा वंदन

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील वसंतराव नाईक चौकात सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झेंडा वंदन करण्यात आले. कोरोनाचे संकट असल्याने रॅली न काढता मोठे कार्यक्रम रद्द करून सध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण, हरिष जाधव, वैभव जाधव, शिवाजी चव्हाण, वसंत पवार, विलास राठोड, सूर्यकांत राठोड, बालाजी राठोड, संतोष चव्हाण, श्रीमंत चव्हाण, दत्ता राठोड, रवी राठोड, कैलास चव्हाण, एम. पी. राठोड , राजू चव्हाण, लखन चव्हाण, कुमार राठोड, सतीश राठोड, श्रीमंत राठोड, विशाल जाधव, पिंटू जाधव आदी उपस्थित होते.