शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याची बाळी जीवावर बेतली, अल्पवयीन मुलाने ५ वर्षीय चिमुकल्याचा जीव घेतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 19:49 IST

सांगवी मार्डीतील धक्कादायक घटना, अकरावीच्या वर्गातील अल्पवयीन मुलाचे कृत्य

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : कानातील सोन्याच्या बाळीसाठी ५ वर्षीय बालकाची गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना शुक्रवारी पहाटे समोर आली आहे. याप्रकरणी ११ वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले असून त्याने खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील ओम मनोज बागल (वय ५) हा वडिलांकडून पैसे घेऊन तापावरील गोळी आणायला म्हणून गुरुवारी दुपारी घराबाहेर पडला. तो पुन्हा घरी परतलाच नाही. ओम घरी न आल्याने कुटुंबियांनी दिवसभर गावात शोधाशोध केली. मात्र, ओम कुठेच सापडला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असता अज्ञाताविरूद्ध अपहरणाचा गुन्हा नाेंदविण्यात आला. शुक्रवारी पहाटे ओम बागल याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका घरात ओमचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. 

दरम्यान, माहिती मिळताच तुळजापूर पाेलीस घटनास्थळी दाखल झाले असता, ओमच्या कानातील बाळी जबरदस्तीने काढल्याचे दिसले. तसेच गळ्यावरही खुणा हाेत्या. त्यामुळे ओमचा खून झाला असावा, असा प्राथमिक निष्कर्ष पाेलिसांनी काढला. यानंतर तपासाची चक्रे गतिमान करून प्राप्त माहितीच्या आधारे पाेलिसांनी अकरावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चाैकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा नाेंद झालेला नव्हता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद