तामलवाडी ते वडगाव (काटी) हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पाच वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. देखभालीचा कालावधी संपून केवळ दीड वर्षाचा कालावधी लाेटला असतानाच हा रस्ता पुन्हा खड्डेमय झाला आहे. थाेडा-बहुत पाऊस झाला, तरी खड्ड्यांत पाणी साचून डबक्यांचे स्वरूप येते. अशा वेळी संबंधित रस्त्यावरून वाहने चालविणेही कठीण जाते. परिणामी, लहान-माेठे अपघात सातत्याने हाेत आहेत. हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने हाेत आहे, परंतु लक्ष देईल, ते प्रशासन कसले. मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचे कष्ट घेण्यास संबंधित यंत्रणा तयार नसल्याने, शुक्रवारी शिवसेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी करीत खड्ड्यांत बेशरमाची लागवड केली. यावेळी समाधान गायकवाड, लक्ष्मण शेंडगे, किरण साखरे, बालाजी चुंगे, तुळशीराम लोकरे, सौदागर माळी, बबन पाटील, अमोल नलवडे, लालासाहेब भालेकर, हनमंत सुतार, श्रीमंत गवळी, मंगेस वासकर, जिल्हाध्यक्ष सर्जेराव गायकवाड आदी उपस्थित हाेते.
शिवसेवा समितीची गांधीगिरी, खड्ड्यांत ‘बेशरमा’ची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST